नाविण्यपूर्णतेचा ध्यास ‘ चिरंतन महासागर ‘ जपण्यासाठी

  विकासाच्या वाटेवर चालत असताना मानवी समाज नेहमी खूप मोठ्या जलस्त्रोता काठी स्थिरवलेला दिसून येतो. मग कधी ही मानवी सभ्यता मोठ्या नदी किनारी विकसित होते तर कधी मोठी शहरे ही समुद्र किनारी विस्तारलेली दिसतात. ठिकाण नदी असो ओढा असो की खाडी वा समुद्र किनारा ‘पाणी’ ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे ज्या भोवती आपले वाड-वडील, आपण आणि आपली येणारी पिढी वास्तव्य करणार आहे. मानवी शरीर असो की इतर कोणी सजीव पेशी साधारण ६०-८०% ही पाण्याने व्याप्त असते; प्रमाणात पेशी आणि प्रजाती प्रकारानुसार फरक दिसून येतो परंतु ‘पाणी’ हा घटक खूपच महत्वपूर्ण हे काही कोणाला नाकारता येणार नाही.
  शाळेत प्रवेश केल्यावर तिसरी किंवा चौथी ला  आपण एक महत्वपूर्ण गोष्ट विज्ञान आणि भूगोलाचा अभ्यास करताना शिकतो ती म्हणजे ‘जलचक्र’ अर्थात जमिनीवर असलेल्या पाण्याची उष्णतेने वाफ होते ही वाफ थंड झाली की त्याचे ढग बनवतात, ढग थंड होऊन जेव्हा जड होतात तेव्हा पाऊस पडतो. शाळेत शिकत असताना आपण एक इयत्ता पास होतो आणि पुढच्या वर्गात सरकत असतो. जलचक्र आणि समुद्र मग आपल्या अभ्यासाचा विषय उरत नाही. परंतु आज जगातिक 'महासागर दिन' या दिवशी निदान आपण काही गोष्टी निश्चित समजून घेतल्या पाहिजे कारण आपण सध्या शाळेत शिकणारे विद्यार्थी असो किंवा नसो परंतु समुद्र किंवा महासागर ही अशी नैसर्गिक बाब आहे ज्याशिवाय आपण जवळपास या भूतलावर जगू शकतच नाही. 
  जेव्हा अवघ्या धरतीवरील विकसित राष्ट्रे माणूस चंद्रावर कसा जाईल याचा प्रयत्न करत होते तेव्हा या निळ्या गोळ्यावर महासागर तळाशी काय अद्भुत जीवसृष्टी आहे याचा शोध घेण्यात जे काही मोजके संशोधन कार्य चालू होतं त्यात एक महत्वपूर्ण नाव म्हणजे 'सिल्विया अर्ली' या महासागरी संशोधन करणाऱ्या महिलेचं. २००९ ला टेड पारितोषिक स्वीकारताना त्यांनी एक प्रसिद्ध वाक्य उद्धरींत केलं 'No Blue No Green' जीवनभर केलेल्या संशोधन कार्याचं सार जणू त्यांनी या एका वाक्यात उभ्या जगासमोर मांडले. ही गोष्ट किती सूक्ष्म आहे याची जाणीव होण्यासाठी एकच गोष्ट आपण समजून घेऊ शकतो ते म्हणजे या पृथ्वीवर कोठेही  राहणाऱ्या माणसाला लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्या योग्य चार पैकी तीन श्वास घेण्यासठी लागणारं ऑक्सिजन आपणांस समुद्रात असणाऱ्या सूक्ष्म अशा प्लवक(Plankton) वर्ग गटात मोडणाऱ्या जीवांपासून मिळतो. या स्पष्टीकरणातून आपणांस समजू शकतो  की महासागर किंवा समुद्र हि आपणास किती महत्वाची आहेत.  शाळेत शिकत असताना एक घोष वाक्य आपण नेहमी वापरतो 'झाडे लावा झाडे जगवा' यातून बहुसंख्य जनमाणसात एक गोष्ट आयुष्यभर डोक्यात राहते कि झाडे आपणांस प्राणवायू वा ऑक्सिजन देतात. परंतु आपण ज्या ग्रहावर राहतो त्यातील ७०% भाग हा पाण्याने व्याप्त आहे. म्हणूनच वृक्ष आपणांस जितका प्राणवायू देतात त्या पेक्षा जवळपास तिहेरी प्रमाणात महासागरात आढळणारे प्लवक आणि इतर सागरी वनस्पती प्राणवायू चा पुरवठा करतात. 
  महासागरी अधिवास किती महत्वाचा आहे हे वर दिलेल्या एका  उदाहरणात आपण समजून घेऊ शकतो. समुद्र विज्ञान शाखेत होत  असलेल्या आधुनिक संशोधन मोहिमा च्या आधारे अश्या बऱ्याच गोष्टी आणि पैलू आज उलगडले जात आहेत ज्या मुले आपणास मानवी समाजच नव्हे तर अखंड पृथ्वी वर असलेले जीवनचक्र या निळ्याशार महासागर आणि समुद्र यांवर विसंबून आहे. 
  या महासागरी अधिवासाची व्यापकता, आवश्यकता आणि उपयुक्तता लक्षात घेऊन जगभरात 'महासागरी दिन' प्रत्येक वर्षी ८ जून ला साजरा करण्यात येतो. १९९२ ला कॅनडा स्थित आंतरराष्ट्रीय महासागरीय विकास केंद्र (ICOD) आणि कॅनडा महासागरीय संस्था (OIC) यांनी एकत्रित रित्या ब्राझील येथे भरलेल्या पर्यावरण आणि विकास विषयक यूएन परिषद मध्ये या संबंधी ठराव मांडला. पण खऱ्या अर्थाने अमेरिकेन सरकारनं या संबंधी प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पहिले  पाऊल उचलले. २००८ पासून आजतागत अखंड रित्या दरवर्षी जगभरात 'महासागरी दिवस' साजरा करण्यात येतो तेही विविध संकल्पनेवर आधारित. यंदा जगभरात कोरोना नामक विषाणूने जरी हलकल्लोळ मांडला असेल तरी या दिवसाच्या तयारी ला सुरवात वर्षभरा पूर्वी सुरवात झाली आहे. यंदा ची संकल्पना आहे 'Innovation for a Sustainable Ocean' अर्थात 'शाश्वत महासागरासाठी नावीन्य उपाययोजना"
 आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा इतका विकास झाला आहे कि हे 'विश्वची माझं घर' ही संत संकल्पना जणू साकारीत झाली आहे. जागतिकी करणाचे वारे इतक्या वेगाने वाहू लागले की संपूर्ण जग आज आपल्या मुठीत विसावले आहे. वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणत होणारी जंगल तोड, दैनंदिन गरजेच्या गोष्टी ची परिपूर्तता होणासाठी वापरलं जाणार खनिज तेल आणि त्यामूले होणारे प्रदूषण या अशा आणि आणखी कित्येक गोष्टी त्यामुळे जाणीवपूर्वक वा अजाणीवपूर्वक आपण मोठ्या प्रमाणत या पृथ्वीला प्रदूषित करीत आहोत. आणि या सर्व बाबींचा सरळ-सरळ परिणाम होत आहे आपल्या महासागरी आणि समुद्री अधिवासावर. जवळपास ८०% हुन अधिक  समुद्रातील मोठे मासे नष्ट झाले आहेत, सागरी अधिवासात असणाऱ्या प्रवाळ वसाहती ५०% पेक्षा अधिक प्रमाणात नष्ट झाल्या आहेत, ध्रुवीय भूभागावर असलेले हिमनग वितळत आहेत, समुद्री पाण्याची पातळी हळूहळू वाढत आहे, महासागरात असणारे सागरी प्रवाह बदलल्यामुळे सर्वत्र रोग राई आणि शेत पिकाचं नुकसान होत आहे या सर्व गोष्टीमुळे एकंदरीत मानवी सभ्यता धोक्याच्या रेषेवर आहे. या सर्व गोष्टी ला समजून घेतल्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल कि कशा स्वरूपात महासागरी अधिवास आपल्या वर परिणाम करतात. 
  मित्रहो म्हणूनच निदान आपण आपल्या परीने छोट्या छोट्या कृतीने हे अधिवास कसे रक्षित करता येतील या दिशेने पाऊल उचलली पाहिजेत. 

  1. मासेमारी करताना आपण फक्त मासेमारी ही फायदावादी    दृष्टिकोन न ठेवता चिरंतन मासेमारी कशी करता येईल या साठी प्रयत्न केले पाहिजे, पापलेट, सुरमई वा कोळंबी अशी फक्त व्यापारी रित्या मागणी असलेल्या मत्स प्रजातींसोबतच इतर मत्स प्रजाती आपण खाणे आणि विकणे यासाठी लोकसमूहात प्रयत्न केले म्हणजे विशिष्ट प्रजाती च्या संख्येवर आलेली दबाव कमी होईल आणि सागरी परीसंस्था अधिक मजबूत होईल. 
  2. प्लॅस्टिक पिशव्या आणि अतिरिक्त खरेदी कमी करून आपण प्रदूषणाला कमी करू शकतो
  3. शक्य असेल तर पायी चालणे वा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे या एका कृतीतून आपण थोड्या प्रमाणात नाही पण कार्बन उत्सर्जन ला कमी करू शकतो.  या आणि अशा  कित्येक गोष्टी आहेत ज्यामुले आपण छोट्या छोट्या कृतीतून महासागरी अधिवास वाचवू  शकतो आणि 
गोष्टी काय केल्या पाहिजे म्हटलं तर त्या खूप साऱ्या आहेत पण मला वाटतं वर मी सूचित केलेल्या तीन कृती आपण जर केल्या तर ते खूप परिणामकारक असेल. तर दोस्तानो आपण या 'महासागरी दिना' च्या निमित्ताने या गोष्टी आपल्या कृतीत उतरवू आणि खऱ्या अर्थाने आपलं आणि आपल्या येणाऱ्या पिढीचं जीवन रक्षित करू. 
                       
- लेखन
प्रदिप नामदेव चोगले 
pradipnc93@gmail.com
mob- 9029145177 



टीप:- मित्रहो आपणांस हा लेख कसा वाटला हे खाली नोंदवा आणि आवडल्यास आपल्या मित्र परिवारात पण शेअर करायला विसरू नका. आणखी काही लेख ज्यातून मी महासागरी अधिवासाविषयी  लिहलं आहे ते खाली लिंक मध्ये आहेत.     


अधिक माहितीसाठी वाचा :- 
१. परशुरामाची भूमी आणि कासव संवर्धनाची विकास गाथा 
        https://pradipnchogale.blogspot.com/2020/05/blog-post_23.html?m=1

२. सागर कथा~ मैफिल समाज रचनेची आणि मासेमारी
       https://pradipnchogale.blogspot.com/2019/11/blog-post.html

३. नाखविणीची खाडी आणि  मुबंईचा कोळी माणूस 
       https://pradipnchogale.blogspot.com/2019/02/blog-post.html

४. बदलणारी मुंबई आणि चिरंतन विकास 
        https://pradipnchogale.blogspot.com/2018/10/blog-post.html

५. सागर कथा ५ -  समुद्री जीव आणि त्यांच्या तऱ्हा ( Oyster drill )
       https://pradipnchogale.blogspot.com/2018/09/oyster-drill.html

६.  सागरकथा  ४ -  अंधार प्रकाशाचा खेळ अर्थात मासेमारी आणि LED लाईट 
           https://pradipnchogale.blogspot.com/2018/09/led.html

७. ससून डॉक:- इतिहासाच्या पानांपासून आजच्या गजबजलेल्या बंदरापर्यंत
          https://pradipnchogale.blogspot.com/2018/09/blog-post.html
  
८. समुदाय-आधारित  संवर्धन (Community-based conservation ), टमर (TAMAR - IBAMA) प्रकल्प ब्राझील आणि महाराष्ट्रातील कोळीवाडे - भाग २
 https://pradipnchogale.blogspot.com/2019/05/community-based-conservation-tamar-ibama.html

९. छायाचित्र https://www.unworldoceansday.org/sites/default/files/2020-01/2019%20COO%201st%20Jacek%20Dybowski%2033367.jpg




  



  


  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५