निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग २

नियोजन शून्य पद्धती मुळे मासेमारी करताना जे अनावश्यक रित्या जाळ्यात पकडले जाते वा फेकले जाते अश्या सगळ्या सागरी संसाधनाचा अंतर्भाव कुटा वा Bycatch या परिभाषेत करता येईल हि गोष्ट आपण मागील लेखा मध्ये समजून घेतल्यावर आता पुढे आपण समजून घेऊ की सागरी सस्तन प्राणी (देवमासे व डॉल्फिन ई..), सागरी पक्षी आणि समुद्री कासवे याची यात काय वताहत होते. जगभरात अथांग पसरलेल्या सागरी क्षेत्रात सात समुद्री कासव प्रजाती आढळून येतात. ऑलिव रीडले, लेदर-बॅक, सी ग्रीन, लॉगर हेड आणि हॉक्सबिल या पाच सागरी कासाव प्रजाती भारतीय मुख्य भूमी चे समुद्री किनारे, सागरी प्रदेश, मुख्य बेटे आणि खाडी तसेच नदीच्या जवळ असल्याची शास्त्रीय अभ्यास नोंदी आहेत. कॅम्प रीडले आणि फ्लॅट बॅक समुद्री कासवे याची खात्रीदायक नोंदी अजून आपल्या येथे झालेल्या नाही आहेत परंतु जगभरात इतर भागात मात्र ही समुद्री कासवे विपुलतेने आढळून येतात. समुद्री कासवे ही सागरी अधिवासात खूप महत्वाची भूमिका बजावतात. सागरी वनस्पति आणि शैवाल याचे बिजप्रसरण, पाठीचा कणा नसलेल्या कित्येक लहान मोठे सागरी जीव हे देखील फार मोठा पल्ला या कसवयांच्या मदतीने पार पाड...