निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग १

 


निळ्या देवमास्याच्या मार्गावर  

 

निळाशार पसरेलला दर्या राजा आणि त्याच्या लाटांवर हिंदोले खात कधी पुढे कधी थोडे मागे असं मार्गक्रमण करणाऱ्या कोळयांच्या बोटी असं दृश्य आपण सर्वानी पहिलं असेल. किनाऱ्यावर शांत पणे उभे राहून वा नारळी-पोकळीच्या बागेत मस्त पणे वाळूत बसून असं दृश्य पाहण हा एक नयन सुख देणारा अनुभव. परंतु याच निळ्याशार दर्या राजाच्या अंतरंगात काय काय आहे हे जर आपण अभ्यासू लागलो तर बुद्धी स्तंभित होईल अशी विविध प्रकारची जैव विविधता आणि नानाविधी नेसर्गिक साधने त्याच्या पोटात दडलेली दिसून येईल. दोस्तहो आज या लेख मालिकेच्या माध्यमातून आपण समजून घेऊ की या मासेमारी आणि जैवविविधता मध्ये असलेला सहसबंध. कश्या स्वरूपात या महासागरात विचरण करणारे अजस्त्र जीव आपल्या दैनंदिन जीव विशेष आहार- विहार सवयी प्रमाणे महासागरी अन्नसाखलीत महत्वपूर्ण भूमिका बजावतात. त्याच बरोबर मासेमारी करताना आपण कश्या स्वरूपात सकारात्मक वा नकारात्मक रित्या या अजस्त्र जीवांवर परिणाम करतो.

  अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत. यातील वस्त्र आणि निवारा ही गोष्ट व्यक्ति आणि समाजा अनुरूप बदलत असते. परंतु यातील अन्न ही आपली अशी गरज आहे की जी स्थल आणि काळ किती ही बदलली तरी मूलभूत स्वरूपात बदलत नाही. आपणं शाकाहारी असो वा मांसाहारी परंतु शरीर नीट व्यवस्थित चालू राहावे म्हणून अपांसास सकस आणि परिपूर्ण आहाराची गरज असते. प्रथिने वा प्रोटीन हे या आहारातील एक महत्वपूर्ण अंग आहे. अमेरिकेची अन्न आणि शेती संशोधन संस्थेच्या २००९ मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार जगभरातील सुमारे दहा कोटी पेक्षा अधिक लोकांच्या प्रथिनांची गरज ही प्रामुख्याने फक्त समुद्री मासे आणि मत्स प्रक्रिया केलेल्या अन्न यांच्या माध्यमांमधून पूर्ण होते. मागणी तसं पुरवठा या वाणिज्य शाखेच्या नियमानुसार एवढी प्रचंड मागणी पूर्ण करण्यासाठी जगभरात मोठ्या प्रमाणात विविध समजघटक आपल्या आपल्या पद्धतीने मासेमारी करत असतात. १९६० च्या पूर्वी ही मासेमारी बहुसंख्य वेळा पारंपरिक ज्ञान आणि मासे पकडण्याच्या वाडा-वडिलांच्या अनुभव सिद्ध जागेत होत असे. परंतु विज्ञान चक्रे जशी वेगाने फिरू लागली तशी मासेमारी करण्याची पद्धती, हत्यारे आणि मत्स्य तंत्रज्ञान यात बद्दल झाला. मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय न रहाता त्याची जागा फायदेवादी धोरण आणि अधिका अधिक अर्थाजन या दिशेने सुरू झाली.  

  अर्थाजन होण्यासाठी मासेमारी करणारे कोणी असो एखादा कोळी बांधव असो वा मोठं मोठ्या व्यवसाईक व्यापारी संघटना काही बाबी या सर्वत्र समानतेने दिसून येतात. त्यातील सगळ्यात जुजबी बाब म्हणजे ‘कुटा’ वा ‘Bycatch’  ही होय. मासेमारी करणारी व्यक्ति कोणी असो वा त्यांची पद्धत काही असो, नियोजन शून्य पद्धती मुळे मासेमारी करताना जे अनावश्यक रित्या जाळ्यात पकडले जाते वा फेकले जाते अश्या सगळ्या सागरी संसाधनाचा अंतर्भाव कुटा वा Bycatch या परिभाषेत करता येईल. कुटा म्हणून जाळ्यात कळत नकळत काय पकडले जाते वा फेकले जाते याची जर आपणास एक झलक पाहायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मासेमारी बांधवाच्या सोबत मासेमारी करण्यासाठी एखाद्या दिवशी समुद्रात वा खाडीत जाव लागेल. ही गोष्ट समजून घेण्यासाठी आणखी एक पर्याय म्हणजे जेव्हा एखादी मासेमारी करणारी बोट किनाऱ्यावर लागते तेव्हा बोटीतून उतरवलेले मासे पाहणे. खाण्यासाठी पूरक ठरतील अश्या आकारचे मासे जाळ्यात असतील तर ठीक आहे परंतु बऱ्याच वेळा बाजारात अश्याच मास्यांच्या भरणा जास्त असतो की जे मासे प्रमाणित वा गरजेपेक्षा कमी आकारचे आणि वजणाचे असतात. बरं बहुसंख्य वेळा आपणास याची जाणीवच नसते एयाद्या मासा वा सागरी जीव याची प्रमाणभूत आकार वा वजन किती असतो. याचीच आणखी एक बाजू म्हणजे खाण्या योग्य नसलेले सागरी जीव मासेमारीच्या जाळ्यात अडकतात जसे की विविध सागरी शंख-शिपले, स्पॉज आणि समुद्री सर्प असे आपणांस नको असलेले जीव. तर कधी कधी याच मासेमारीच्या जाळ्यात अडकतात समुद्री कासवे आणि सागरी सस्तन प्राणी. देवमासे व डॉल्फिन असे सागरी सस्तन प्राणी आहेत जे बहुधा मासेमारीच्या जाळ्यात कळत नकळत अडकले जातात तर कधी कधी चुकीच्या प्रवृतीला बळी पडून मुद्दाम पकडले जातात.

  काय आहे या गोष्टीची विज्ञान सिद्ध बाजू जेव्हा मासेमारी जाळ्यात समुद्री कासवे, सस्तन प्राणी(डॉल्फिन, देवमासे ई.) अडकून पडतात आणि त्याचे मानवी जीवनांवर कोणते दीर्घ कालावधी साठी परिणाम होतात. समजून घेऊ या लेख मालिकेच्या पुढील भागात.

_क्रमश

लेखन :-

एक सागरपुत्र  

प्रदिप नामदेव चोगले

भाग १   (दि २०-११-२०२०, शुक्रवार, केरळ-मुंबई रेल्वे प्रवास)

Email: - pradipnc93@gmail.com             Mob: - 9029145177          

 

संदर्भ:-

·         FAO Fisheries and Aquaculture Department. (2009) The state of world fisheries and aquaculture. Food and Agriculture Organization of the United Nations, Rome, 196 p.

·         Davies RWD, Cripps SJ, Nickson A, Porter G (2009) Defining and estimating global marine fisheries bycatch. Marine Policy 33:661–672.

·         चित्रे: - https://in.pinterest.com/pin/261349584614351899/

Comments

  1. Very nicely compiled , will be waiting for the part 2

    ReplyDelete
    Replies
    1. Yes sir very soon next part will come. Happy for your response.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५