निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग २


नियोजन शून्य पद्धती मुळे मासेमारी करताना जे अनावश्यक रित्या जाळ्यात पकडले जाते वा फेकले जाते अश्या सगळ्या सागरी संसाधनाचा अंतर्भाव कुटा वा Bycatch या परिभाषेत करता येईल हि गोष्ट आपण मागील लेखा मध्ये समजून घेतल्यावर आता पुढे आपण समजून घेऊ की सागरी सस्तन प्राणी (देवमासे व डॉल्फिन ई..), सागरी पक्षी आणि समुद्री कासवे याची यात काय वताहत होते.

  जगभरात अथांग पसरलेल्या सागरी क्षेत्रात सात समुद्री कासव प्रजाती आढळून येतात. ऑलिव रीडले, लेदर-बॅक, सी ग्रीन, लॉगर हेड आणि हॉक्सबिल या पाच सागरी कासाव प्रजाती भारतीय मुख्य भूमी चे समुद्री किनारे, सागरी प्रदेश, मुख्य बेटे आणि खाडी तसेच नदीच्या जवळ असल्याची शास्त्रीय अभ्यास नोंदी आहेत. कॅम्प रीडले आणि फ्लॅट बॅक समुद्री कासवे याची खात्रीदायक नोंदी अजून आपल्या येथे झालेल्या नाही आहेत परंतु जगभरात इतर भागात मात्र ही समुद्री कासवे विपुलतेने आढळून येतात. समुद्री कासवे ही सागरी अधिवासात खूप महत्वाची भूमिका बजावतात. सागरी वनस्पति आणि शैवाल याचे बिजप्रसरण, पाठीचा कणा नसलेल्या कित्येक लहान मोठे सागरी जीव हे देखील फार मोठा पल्ला या कसवयांच्या मदतीने पार पाडतात. सागरी अधिवासा पोषक करेल अश्या सेंद्रिय घटकाची देवाणघेवाण समुद्री कासवे आपल्या पूर्ण जीवन चक्रात यशस्वी पद्धतीने पार पाडतात. एखादा जीव जेवढं प्रदीर्घ जीवन जगतो तितकीच महत्वपूर्ण भूमिका तो तेथील अधिवास आणि अन्न साखळी मध्ये पार पडतो. ‘जीवो जीवस्य जीवनम’ या श्री भागवत पुराण तेरावा अध्याय प्रथम स्कंध श्लोक क्रमांक सेहचाळीस मध्ये वर्णन केलेली उक्ती आपणांस सर्वाना ज्ञात असेल. इयत्ता तिसरी ला मराठी शाळेत मला हे सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासाला होत. परंतु नियोजित शिक्षण व्यवस्थेतून आपण बाहेर पडलो की या साऱ्या गोष्टी सपशेल विसरतो. शाळेत असताना एक जीव दुसऱ्या जिवाच्या आधाराणे जगतो आणि वाढतो हे विकासात्मक ध्येय घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी रोजी रोटीच्या नादात जेव्हा आज कालच्या समाज धारनेनुसार व्यवहारी पद्धतीने जगतो तेव्हा एक जीव दुसऱ्या जिवाला खाऊन वा मारून जगतो या तत्वाचा अंगीकार करतो. त्यांचेच मूर्तिमंत दाखले म्हणजे निसर्गाचा मुडदा पाडून उभी असलेली प्रगतशील मानवी सभ्यता. सगळ्यांनाच समुद्री किनारी घरे, बंगले आणि कारखाने हवे आहेत. समुद्री मार्गे प्रवासी आणि मालाची स्वस्त वाहतूक करता येते म्हणून जगभरातील सगळे सागरी अधिवास आपण प्रदूषित केले आहेत. मग हे प्रदूषण पाण्याचे असो वा प्लॅस्टिकचे. जगभरात अनियंत्रियत प्रमाणात वाढत जाणारी लोकसंखेची भूक भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मासेमारी चालू आहे.

   २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या ब्रायन पी. वॉलिस आणि इतर संशोधक मंडळी ने एक शोध निबंध प्रकाशित केला आहे. साल १९९० ते २००८ या कालखंडात जगभरात सुमारे ८५,००० पेक्षा अधिक सागरी कासवे ही मासेमारी करताना जाळ्यात अडकली गेली. कुटा वा Bycatch या संकल्पनेच्या खाली झालेली ही संशोधकीय नोंद म्हणजे एखाद्या बुद्धीनिष्ठ मानव समूहाला बसलेला जबरदस्त वैचारीक हादरा होय. मासेमारी करण्याच्या नानाविधी पद्धती आणि त्याला पूरक असे मत्स जाळ्याचे प्रकार आहेत. यातील गिल नेट, लॉन्ग लाइन आणि ट्राल नेट हे या कासव पकडीला मुख्य जबाबदार ठरणारे प्रकार. या संशोधनातील एक विस्मयकारक बाब काय असेल तर ती ही की सुमारे ८५,००० जाळ्यात अडकलेले समुद्री कासवे हा आकडा खात्रीदायक स्वरूपात नोंद झालेल्या मासेमारी माहिती च्या आधारे असला तरी हे प्रमाण ज्याची कधीच नोंद होत नाही अश्या मासेमारीशी तुलना करता फक्त १% एवढेच आहे. जगभरात आज देखील किती प्रमाणात किती पद्धतीने कोणते मासे पकडले जातात याचे संपूर्ण खात्रीदायक आकडे उपलब्ध नाही आहेत. याच मुख्य कारण काय असेल तर सर्वत्र विखुरलेले छोट्या आणि पारंपरिक मासेमारीचे जाळे. आज देखील खूप मोठ्या प्रमाणात मासेमारी समाज जगभरात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतो यात बऱ्याच वेळा असे मासेमारीचे प्रकार असतात ज्या साठी कायदेशीर रित्या नोंद करावे लागतील अश्या सामुग्री वा मासेमारी बोटीची गरज भासत नाही. 

वरील चित्रात एकूण तीन नकाशे दर्शवले आहेत जे अनुक्रमे 'कुटा' वा Bycatch यांची जागतिक तीव्रत दर्शवतात. यातील चोकोण, गोल व अधिक ची चिन्हे अनुक्रमे लॉन्ग-लाइन, गिलनेट व ट्राल नेट चे सूचक आहेत. नकाशे A,B,C अनुक्रमे समुद्री पक्षी, सागरी सस्तन प्राणी व समुद्री कासवे याचे तीव्रता दर्शक नकाशे आहेत. 



  समुद्री कासवे ही जेव्हा कधी आपल्या अंड्यातून बाहेर पडतात तेव्हा ते आपल्या उपजत स्वभाव गुणधर्मा अनुसार समुद्रात प्रवेश करतात यातील मादी सागरी कासवे प्रजनन करण्यासाठी आपल्या जन्म झालेल्या सागर किनारी येतात. विशिष्ठ प्रजाती चे सागरी कासव आपल्या खास आणि अनुकूल असलेल्या सागर किनारी दाखल होतात. यात कोणाला शांत सागरी किनारे आवडतात तर कोणाला खाडी वा नदी चा किनारा पसंत येतो. किनारी अंडी घालणे आणि अंडी दिल्या नंतर समुद्रात पुन्हा जाणे याची काळ-वेळ ही प्रजाती अनुरूप बदलत असते.         

 _क्रमश

लेखन :-

एक सागरपुत्र 

प्रदिप नामदेव चोगले

भाग २    (दि ३०-११-२०२०, सोमवार, मुंबई-केरळ रेल्वे प्रवास)

Email: - pradipnc93@gmail.com             Mob: - 9029145177          

 

संदर्भ:-

·         Davies RWD, Cripps SJ, Nickson A, Porter G (2009) Defining and estimating global marine fisheries bycatch. Marine Policy 33:661–672.

·         www.iucnredlist.org; accessed 30 December 2020

·         Wallace, B. P., Lewison, R. L., McDonald, S. L., McDonald, R. K., Kot, C. Y., Kelez, S., ... & Crowder, L. B. (2010). Global patterns of marine turtle bycatch. Conservation letters, 3(3), 131-142.

·         Lewison, R. L., Crowder, L. B., Wallace, B. P., Moore, J. E., Cox, T., Zydelis, R., ... & Bjorkland, R. (2014). Global patterns of marine mammal, seabird, and sea turtle bycatch reveal taxa-specific and cumulative megafauna hotspots. Proceedings of the National Academy of Sciences111(14), 5271-5276.

·         Image: -

Sea Turtle of the world

https://www.seeturtles.org/online-store/sea-turtle-id-card

 

Map image from: -

https://www.pnas.org/content/111/14/5271

 

Note: - Bycatch intensity for (A) seabirds, (B) marine mammals, and (C) sea turtles for records from 1990 to 2008. Three gear categories (gillnet, longline, and trawl) are represented by separate symbols, and symbol size is scaled to reflect the proportional amount of observed fishing effort for each record. Bycatch data records that did not have reported observed effort are shown in

 


 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५