Posts

Showing posts from February, 2021

अनपेक्षित अतिथी

Image
 केरळ मध्ये आल्या नंतर काही अनपेक्षित पक्षी पाहण्याचा योग आम्हा दोघांना लाभला. पश्चिमी घाट प्रदेशात आढळणारा व्हाइट-बेल्ड ट्रीपी ज्यास मराठी मध्ये पांढऱ्या पोटाचा टकाचोर असं म्हणतात तो हा पक्षी आणि त्याची वर्तणूक या संबंधी मी लिहिलेला हा लेख 'दैनिक अमर उजाळा' या हिंदी भाषिक वर्तमान पत्रात नुकताच प्रकाशीत झाला आहे.   मित्रहो खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून तुम्ही हा लेख वाचू शकता. हिंदी भाषेत लेख लिहिण्याचा माझा हा पहिला प्रयत्न आहे. नक्कीच वाचा आणि आपली प्रतिक्रिया कळवा. https://www.amarujala.com/columns/blog/bird-watching-in-lockdown-love-and-birds-love-bird-watching-in-india?src=top-lead&pageId=1 छायाचित्र: -  John Gould (1804 – 1881)  -  Transactions of the Zoological society of London https://en.wikipedia.org/wiki/White-bellied_treepie#/media/File:DendrocittaLeucogastra.jpg

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ३

Image
  निसर्ग निरीक्षण आणि कुतूहल   माझ्या समस्त अक्षरज्ञान असलेल्या दोस्तानो    खूप दिवस मनात एक गोष्ट घर करून होती जी मला व्यक्त करावीशी वाटत होती. ही गोष्ट आहे ‘निसर्ग निरीक्षण’ आणि ‘जिज्ञासा’ या बाबत. साधारण आज दहा दिवस झाले असतील मी कर्नाटकची सागरी सफर करून पुन्हा रोजच्या ठिकाणी ‘सागरी सस्तन प्राणी प्रयोगशाळा’ केंद्रीय सागरी मत्सकी संशोधन संस्था, केरळ येथे रुजू झालो आहे. पंधरा दिवस दर्या राज्याचे अथांग वैभव पाहून मी पुरता मंत्रमुग्ध झालो आहे. शाळा-महाविद्यालये आणि शेवटी मुंबई स्थित विज्ञान संशोधन संस्था येथील वास्तव्यात मी जे काही वाचलो, शिकलो आणि ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि जे या पंधरवड्यात पहिले ते एका बाजूला. वि. वा. शिरवाडकर लिखित ‘कोलंबस चे गर्वगीत’ ही कवीत सतत माझ्या मनात पिंगा घालत होती परंतु त्यात ही ‘नाविकाणा ना कुठली भीती’ ही ओळ खास.   समुद्राच्या लाटांवर हिंदोले खात वर खाली होणारी आमची बोट सतत पोटात जे आहे नाही त्या सगळ्या बाबी समुद्र मंथानात जसे हलाहल विष बाहेर पडते तसे हालहाल करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. पण त्या वेडीला