निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ४
सातपटी - मुरबे आणि पापलेट मार्च महिन्याच्या १४ तारखेला आम्ही आमचा प्रवास सुरू केला तो अर्थात केंद्रीय समुद्री मत्सकी संशोधन संस्था कोचीन कडून महाराष्ट्राच्या दिशेन. वर्ष २०१२ मध्ये ‘भारतीय समुद्री परीक्षेत्रा अंतर्गत आढळणारे सागरी सस्तन प्राणी’ या प्रकाशित झालेल्या पुस्तका अनुसार भारतीय समुद्री क्षेत्रात सत्तावीस विविध सागरी सस्तन प्राणी असण्याची नोंद करण्यात आली आहे. या उपलब्ध संशोधन माहितीची शिदोरी घेऊन सध्या भारतीय परीक्षेत्रात आढळणारे सागरी सस्तन प्राणी याची एकूण प्रजाती विविधता आणि विपुलता समजून घेणे हाच उद्देश ठेऊन आम्ही महाराष्ट्राकडे प्रयाण केले. सुमारे ७२० किमी सागरी किनारा महाराष्ट्राला लाभला आहे या समुद्री किनाऱ्य अंतर्गत विविधतेने संपूर्ण अशी बंदरे आणि कोळीवाडे या किनाऱ्य वर डोलाने उभे आहेत. या सागरी संशोधन सफरी अंतर्गत जे काही संशोधन होईल ते आपण सारेच काही कालावधी च्या अंतराने विविध संशोधन शोधपत्रिकेच्या लेख मालिकेच्या स्वरूपात वाचू शक...