अनुभव विश्व _ माझ्या कविता

 




पवित्र रमजान आणि मी

 

  ईश्वराच्या बागेतली प्रत्येक फुलं सुंदर असतात

                कारण ती त्यांनीच निर्माण केलेली असतात

  आपण म्हणतो हा छान तो वाईट, ती सुंदर आणि ती फक्त बरी

         परंतु ही सारी तोकडी मापे असतात आपल्या फुटपट्टीची

 

   डोक्यावरून ओढणी घेणारी रुबिना आणि केस मोकळे सोडलेली योजना

          कानाला जानव अडकवणारा गोपाळ की चर्च मधला जॉन भाई

   या साऱ्यांची नावे आपण जेव्हा पुकारतो तेव्हा आपल्याला काय आठवते?

          त्यांची धर्म, जात, प्रार्थनास्थळे आणि पूजेची साधने

 

   ईश्वराला कसे अनुभवावे यांचे नानाविधी मार्ग सारे

      पण जेव्हा सुर जुळून येतात व मन एक होतात तेव्हा तो प्रकट होतो

   निळे पाणी – मोकळे आकाश कधी गढूळ वा आंधरलेलं नसतं

      ते कधी उजळ कधी गडद यासाठी दिसते की आपण त्याला केव्हा कसे पाहतो

 

    दूर केली आतील दारीद्रता तर दैवी गुणाची संपत्ती लाभते

         फक्त आपण तयारी ठेवली पाहिजे ती स्वीकारण्याची

     वारी, दिंडी की हज यात्रा वा असो ख्रिसमस न्यारी

         तोच तु, तूच तो आणि मीच तो हिच सत्याची त्रयी सारी



प्रदिप नामदेव चोगले

१५-०४-२०२१

°४९. ६९१ उत्तर

७२°५२. ०६९ पूर्व

१८:५४:३६



 

 

टीप: - सागरी सस्तन प्राणी आणि समुद्री कासवे यांच्या संशोधन मोहिमे मध्ये व्यस्त असताना एका सायंकाळी माझ्या मित्र दिलशाद सोबत सहज बोलत असताना जे मला सुचल ते मी येथे लिहल आहे. गावी शाळेत शिकत असल्यापासून ते अजतागत खूप सारे मित्र अल्हाच्या पवित्र मार्गावरून चालत असताना दिसले. मला ही सगळी मंडळी जात, धर्म या पेक्षा एक सुंदर मनुष्य, छान मित्र म्हणून जास्त अधोरेखित झाले. माझ्या साऱ्या दोस्ताना पवित्र रमजाण च्या खूप साऱ्या शभेछ्या.                                               

Comments

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५