निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५
वादळ वाऱ्य सुटलं गं – बॉटम ट्राल व सागरी अधिवास कोचीन बंदरापासून काल संध्याकाळी बाहेर आलो होतो. साधारण सायंकाळी ५ वाजता बोट आम्ही किनाऱ्यावरून बाहेर काढली. मोठे जहाज आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या मार्गिकेतून फिशरी सर्व्ह ऑफ इंडिया ची बोट ‘मत्स्य वर्षणी’ जीच्यावर आम्ही स्वार होतो ती सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आम्ही नांगर टाकून स्थिर केली. साधारण केरळ राज्याची सीमा संपून कर्नाटक सुरू होतो आश्या किनारा लगत असलेल्या ठिकाणाहून आम्हाला खोल समुद्रात २१२ सागरी मैल एवढं अंतर कापायच होतं. सध्या बोट जिथे स्थिर उभी होती तिकडून उत्तर दिशेला १३०-१५० सागरी मैल एवढं अंतर तत्पूर्वी किनार्यालगत पार करण अनिर्वाय होतं. मान्सून पाऊस आणि वारा आम्हाला चांगलाच झोडपून काढत होता. १२ सागरी मैल प्रती तास वेगाने प्रवास करणारी आमची बोट या वादळ वाऱ्यात हेलकावे खात ३-४ वा ६-७ एवढंच वेग गाठू शकत होती. ती तरी काय करेल बापडी भारत सरकार च्या फिशरी सर्व्ह विभागात ४० वर्ष सेवा बाजावून ती अगदी थकून गेली होती. एवढं मात्र खरं की वार्षिक पर्यवेक्षण आणि देखफाल सातत्याने होत असल्यामुळे ती अगदी अनुभवाचे ऊन पाऊस पाह...