आनंदाचे शोध यात्री

निसर्ग संवर्धनाचे वाटेकरी- अर्चिया कार 



"The desire to travel and study the flora and fauna of new regions has flowed through the veins of many naturalists going all the way back to Linnaeous" 
  पृष्ठ क्रमांक ६३ वर लिहलं गेलेलं हे वाक्य वाचून मला अतिशय आनंद झाला. लहान पणापासून आपण निसर्ग पाहत असतो त्याच्या सोबत खेळत बागडत असतो, परंतु निसर्गामध्ये रमणे हि बहुसंख्य मंडळींसाठी एका ठराविक वयानंतर केवळ एक आठवण बनून जाते. पण काही मंडळी या भूतळावर विविध भागात निसर्ग हाच धर्म, ध्येय आणि छंद समजून आपलं  जीवन आनंदाने भरून टाकतात. याच निसर्ग आनंदाचे एक बीज आपल्या हृदयात पेरून जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे 'अर्चिया कार' हे होत. दिनांक १६ जून १९०९ या दिनी जन्मलेल्या या व्यक्ती आपलं संपूर्ण जीवन निसर्ग अभ्यासणे, संशोधन व विशेतात समुद्री कासव संवर्धन आणि लोकचळवळ या साठी समर्पित केलं. आज जगभरात निसर्ग संवर्धन विशेतः 'समुद्री कासव संवर्धन व संशोधन' व त्याच बरोबरीने या निसर्ग पूरक जीवनशैली ला साजेशी जीवन जगणारे स्थानिक मासेमारी समाज व त्यांना या संवर्धनात सामावून घेण्याचं प्राथमिक स्वरूपाचा कार्य 'अर्चिया कार' याने जगात पहिल्यांदा प्रकर्षाने सुरु केलं. त्यांच्या कार्याची दखल घेत १६ जून हा दिवस जगभरात 'जागतिक समुद्री कासव दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांचं कार्य हे इतकं व्यापक आणि मूलगामी स्वरूपाचं आहे कि त्याच्या अभ्यासाने आज देखील समुद्री जीवसृष्टीचं संवर्धन आणि संशोधन योजना आखताना आपणांस प्रेरणा मिळते. 
  एखादं व्यक्तिमत्व समजून घेताना बहुसंख्य वेळा ती व्यक्ती कधी, कुठे, केव्हा या स्थळ काळ संबंधी जुजबी माहिती मांडण्यात आपला बऱ्याच वेळा खर्च करते. हे हि खरं कि अश्या स्वरूपाची सांख्यिक माहिती हि खूप महत्वाची असते, परंतु मला वाटतं कि या पेक्षा अधिक आपण ते व्यक्तीमत्व कसं घडलं याचा उपपोह करण्यात जरा प्रयत्न केला पाहिजे. बालपणासासून आपल्या वडील आणि भावंड यांबरोबर बऱ्याच वेळ कार आपला वेळ समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाणे, बोटीने छोट्या मोठ्या सफारी करणे, नदी आणि ओढ्या मध्ये तरंगणाऱ्या जलीय वनस्पती आणि शैवाळ जमा करणं त्याची निरीक्षणे नोंदवणे यात व्यतीत करत असे. फ्लोरिडा विद्यापीठातून उच्च शिक्षण घेत असताना आपले लाडके शिक्षक 'बारबारीस' यांच्या प्रेरणेमुळे त्यांनी विद्यार्थीदशेतच आपल्या संशोधनाची सुरवात केली. सरीसृप अर्थात सरपडणारे प्राणी ज्यात सर्प, सरडे, कासवे आणि बेडूक या प्राण्याचा अंतर्भाव होतो अश्या सजीव प्राण्यावर त्यांनी सुरवातीला काम केलं. ९० च्या दशकात दूरदर्शन ने भारतीय प्रेक्षक वर्गाला निरनिराळे कार्यक्रमांची भरूभरून देणगी दिली. त्या वेळी आपण सगळ्यांनी 'मोगली' हि मालिका नक्कीच पाहिली असेल. रुडयार्ड किपलिंग रचित 'The Jungle Book' या पुस्तकावर आधारित हि मालिका होती. अर्चिया कार यांच्या बाळमनावर या पुस्तकाचा प्रभाव खूप खोलवर पडला. या पुस्तका मुले असंच काही नक्की सांगता येणार नाही परंतु निसर्ग निरीक्षण, भटकंती याची पाळेमुळे कुठे तरी या गोष्टीशी जोडता येतील एवढं नक्कीच. 
  मेक्सीको च्या भ्रमंती मध्ये त्यांनी नवं नवीन प्रदेश पालथा घातला आणि विज्ञानासाठी काही नवीन जीव सृष्टी ची ओळख करून दिली. संपूर्ण जगभरात सागरी क्षेत्रात सात समुद्री कासवांच्या प्रजाती आढळून येतात ज्यात ऑलिव्ह रिडले, लेदर बॅक, लॉगर हेड, ग्रीन सी टर्टल आणि हॉक्सबिल या पाच प्रजाती आपल्या भारतीय सागरी क्षेत्रात नोंदवल्या गेल्या आहेत तर कॅप रिडले आणि फ्लॅट बॅक ह्या दोन प्रजाती इतर जगभरात नोंदवल्या गेल्या आहेत. १९४२ च्या सुरवातीला सागरी कासवे आणि त्याच्या प्रजाती अनुरूप वर्गीकरण यात बरेच संभ्रम आणि अडचणी होत्या. याच वर्षाच्या सुरवातीला अर्चिया कार यांनी आपलं पहिले सागरी कासव संबंधी संशोधन प्रकाशित केलं. लॉगरहेड, कॅम्प रिडले आणि ऑलिव्ह रिडले या तीन सागरी कासव प्रजाती संबधी त्यांनी  'Notes on Sea Turtle'  या शीर्षकाखाली एक लेख प्रकाशित केला ज्यात त्यांनी लॉगरहेड एक गटात आणि ऑलिव्ह रिडले आणि कॅम्प रिडले या दोन दुसऱ्या गटात मांडण्याचा प्रयत्न केला. त्या काळातील आणखी एक प्रसिद्ध सरीसृप संशोधक डॉ. स्टेजनर याच्या सोबत त्या मुले त्याचं बरेच मतभेद झालं. परंतु आज वर्ष २०२१ मध्ये आपण लॉगरहेड प्रजाती ला वैज्ञानिक भाषेत Caretta caretta व ऑलिव्ह रिडले आणि कॅम्प रिडले यांना अनुक्रमे Lepidochelys olivacea, Lepidochelys kempii असं संबोधतो. याचा अर्थ आपण या तीन कासव प्रजाती दोन पोटजाती Caretta, Lepidochelys मध्ये अनुक्रमे वर्गीकृत करतो. 
  पुढील भाग वाचण्यासाठी भेटू या लेखाचा दुसऱ्या भागात --
--क्रमश 

लेखन -
प्रदीप नामदेव चोगले 
मो: - ९०२९१४५१७७
pradipnc93@gmail.com



टीप: - आपणांस हा लेख कसा वाटलं हे खाली आपल्या प्रतिक्रिया देऊन नक्कीच कळवा 




संदर्भ : - 
1. Handbook of turtles by Archie Carr
2. The windward road by Archie Carr
3. The man who saved sea turtles Archie Carr and the origins of conservation biology by Frederick Rowe Davis
4. Image reference from
https://images.squarespace-cdn.com/content/v1/5369465be4b0507a1fd05af0/1602102567799-R6VP43QFWZO40QTR6QWR/Archie+Carr_05.jpg?format=1500w







 




  













Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५