माझ्या कविता- थोरो आणि पाऊस
थोरो आणि पाऊस टप-टप टप -टप करणारा सततचा पाऊस रप रप करणारी हि काळी माती भिरभिरणारे हे भ्रमर फुलांवर आडोसा शोधणारे संसार रस्त्या रस्त्यावर II१II आजकाल तो काही दिन ऋतू पाहून येत नाही बरसत असतो अहोरात्र बरसत असतो तिकडे जेथे आंबा मोहरला आहे आणि तेथेही जेथे कापूस फुलत आहे अचानक, बेभान, बेहिशोबी आणि अकल्पित II२II अंदाज तर माणसांचे नेहेमी चुकतात हिशोबी दुनियेत पण ज्यांच्या अंदाजाने दुनिया झुकते तेही आता जरासे हतबल झालेत वाढत जाणाऱ्या तापमानाने वितळत जाणाऱ्या हिमनगाणे, जमिनीवर झेपावणाऱ्या महासागराने II३II आमचा आजूस बोलायचा बाला हाव बरी नाही पण आम्ही पोरं जरा जास्तच शिकलो शाळा म्हणूनच आज एका दारी चार गाड्या आणि बायकोला ढिगभर साड्या प्रतिनिधित्व करत आहेत आमच्या निसर्ग विन्मुख जीवनशैलीचे II४II वाचतो मी आता थोरो, टागोर आणि टॉलस्यटॉय उमजण्या मार्ग निसर्ग सुसंगत जीवनाचे म्हणुनच मी म्हणतो आता त्याला त्य...