माझ्या कविता- थोरो आणि पाऊस


थोरो आणि  पाऊस  


टप-टप  टप -टप करणारा  सततचा पाऊस 

  रप रप करणारी हि  काळी माती 

भिरभिरणारे हे भ्रमर फुलांवर 

  आडोसा शोधणारे संसार रस्त्या रस्त्यावर  II१II


आजकाल तो काही दिन ऋतू पाहून येत नाही 

बरसत असतो अहोरात्र बरसत असतो 

तिकडे जेथे आंबा मोहरला आहे आणि तेथेही जेथे कापूस फुलत आहे 

अचानक, बेभान, बेहिशोबी आणि अकल्पित   II२II


अंदाज तर माणसांचे नेहेमी चुकतात हिशोबी दुनियेत 

पण ज्यांच्या अंदाजाने दुनिया झुकते 

तेही आता जरासे हतबल झालेत वाढत जाणाऱ्या तापमानाने 

वितळत जाणाऱ्या हिमनगाणे, जमिनीवर झेपावणाऱ्या महासागराने   II३II


आमचा आजूस बोलायचा बाला हाव बरी नाही 

  पण आम्ही पोरं जरा जास्तच शिकलो शाळा 

म्हणूनच आज एका दारी चार गाड्या आणि बायकोला ढिगभर साड्या 

    प्रतिनिधित्व करत आहेत आमच्या निसर्ग विन्मुख जीवनशैलीचे   II४II


वाचतो मी आता थोरो, टागोर आणि टॉलस्यटॉय 

उमजण्या मार्ग निसर्ग सुसंगत जीवनाचे 

म्हणुनच मी म्हणतो आता त्याला 

त्याला म्हणजे पाऊसाला ...   II५II 


अरे बस्सं कर 

  बस्सं कर आता 

माणसं उन्हाने नाही 

आता पाऊसाने होरपळुन जातात   II६II


कवी

- प्रदिप नामदेव चोगले 

१६ जानेवारी २०२२, २२:३७/ केरळ 

pradipnc93@gmail.com

Mob_ 9029145177 


  अंखड जगताला भेडसावणाऱ्या 'जगातिक हवामान बदल' म्हणजेच 'climate change' चा एक दृश्य परिणाम म्हणजे आपल्या देशात आजकाल सतत येणारा अचानक जोरदार पाऊस आणि पूर. २०११ साली प्रकाशित झालेल्या एका संशोधन लेखा प्रमाणे हे प्रमाण भारताचा  किनारपट्टी भाग, पूर्व भाग आणि ईशान्य भागात वाढत आहे तर उत्तर आणि मध्य भारतात हे प्रमाण कमी होत आहे. आपल्या देशात आणि राज्यात होणारी पारंपरिक शेती आणि बागायत यांचे पूर्वी फार सुरेख नाते वेळेत येणाऱ्या पाउसा सोबत होते जे कित्येक लोकगीते आणि कथा मध्ये अंकीत आहे परंतु आता त्याची सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. अचानक पडणारा हा पाऊस आणि त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर आहेत. निसर्ग संशोधन करत असताना मी जे पाहिलं, वाचलं ते या कवितेतून मी मांडलं आहे. 

  थोरो चं प्रसिद्ध पुस्तक वॉल्डन वाचतं  असताना आपण निसर्ग पूरक जीवन जगलो पाहिजे असं जाणवलं. अपेक्षा करतो हि कविता आपल्याला अश्या निसर्ग पूरक जीवन जगायला प्रेरणा देईल. 


संदर्भ: - 

Guhathakurta, P., Sreejith, O. P., & Menon, P. A. (2011). Impact of climate change on extreme rainfall events and flood risk in India. Journal of earth system science120(3), 359-373.

Pareek, A., & Trivedi, P. C. (2011). Cultural values and indigenous knowledge of climate change and disaster prediction in Rajasthan, India.

हेन्री डेव्हिड थोरो (अनुवाद जयंत कुलकर्णी ) वॉल्डन. मधुश्री पब्लिकेशन  


----------------------------------------------------------------------------------- टीप: - आपणांस हि कविता आणि हे विचार आवडल्यास आपल्या मित्र आणि कुटूंबा सोबत नक्कीच शेअर करा. आपली प्रतिक्रिया  कमेंट मध्ये नोंदवू शकता. माझ्या आवाजत हि कविता ऐकण्यासाठी माझ्या युट्युब चॅनल वर आपण क्लीक करा आणि याचा आस्वाद घ्या. 




 






  

Comments

  1. Replies
    1. तुला आवडली हे पाहून आनंद झाला. धन्यवाद या प्रतिक्रिये बद्दल.

      Delete
  2. Khup chan.... Dev tula lihnyasathi khup shakti budhhi deo

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद धीरज भाऊ. तुझ्या सदिच्छा बद्दल मी कृतज्ञ आहे.

      Delete
  3. पुन्हा एकदा शुभेच्छा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५