समुद्र संवर्धन लेख मालिका - २

दर्याला आयलाय फुल जर तुम्ही पावसाच्या सरी कोकण किनारी येणाच्या आधी म्हणजे साधारण एप्रिल-मे मध्ये किनारी भेट दिली तर निळ्या फुलांसारखे काही तरी किनारी तरंगताना पाहू शकता. जीवशास्त्रीय वैज्ञानिक भाषेत याला Porpita porpita (पोरपिटा पोरपिटा) असे नामाभिमान आहे. पाऊस लवकरच येणार आहे याचं एक संकेत म्हणून पूर्वापार कोकणातील मासेमारी (कोळी) बांधव याची खूणगाठ बांधून आहेत. साधारण गेल्या चार-पाच वर्षापासून आपले मासेमारी बांधव ज्या जेली फिश च्या वाढत्या संकटाने हैरान झाले आहेत त्या प्राण्याच्या गटात किंवा वैज्ञानिक भाषेत ज्यास संघ (Phylum) असे म्हणतात त्यात यांचा समावेश होतो. परंतु या मधील मूलभूत फरक म्हणजे जेली फिश हा एक अखंड जीव असतो तर 'समुद्र फुल' (पोरपिटा याचे स्थानिक भाषेतील नाव )म्हणजे असंख्य प्राण्याची एक वसाहत असते जी वर फोटोमध्ये दखवलेल्या प्रमाणे मधल्या वर्तुळाकार पोकळ चकती ला जोडली गेलेली असते. पारंपारिक मासेमारी करणारे बांधव आपल्या वडिलोपार्जित असलेल्या अनुभव आणि ज्ञान यांच्या जोरावर बऱ्याच अंशी आज देखील आपले अंदाज बांधत म...