माझ्या कविता
निरुपयोगी जीव कधी कधी आपण देवाकडे केलेला अट्टहास फारसा बरा नसतो कधी आपल्यासाठी पण बहुधा त्यांच्या साठी ज्यांवर आपण जीव ओतत असतो !!१!! वेळ हळू हळू सरत असते वाळूच्या घटिकेत झरझरणारी अगदी तसंच बहुधा काही गोष्टी सुटत असतात आपल्या हातून !!२!! योग्य वेळी हात सैल सोडणं गरजेचं असतं अबोल पणे निदान ते थोडं तरी सुखावह असतं कोणाच्या भल्यासाठी !!३!! आजकाल जास्त प्रेम, काळजी आणि आपुलकी फारशी बरी नसते जीव कोणाचा हा का कधी अगदी गुदमरून जातो या अधिम प्रेम भाराने !!४!! आपण किती निरुपयोगी आहोत या जगी ह्याची प्रचिती येते तेव्हा जेव्हा मीच मला म्हणतो बसं कर आता नाही सोसवत आता !!५!! संपू दे पाश आता या देहाचे हे देवा सरण्या नाती या जन्माची तुटू दे हे हृदय माझे मोडण्या पाश प्रेमबंधाचे !!६!! ~ प्रदिप नामदेव चोगले दिनांक २१ ऑगस्ट २०२२ ०१.१५ मिनिटे, मुबंई टीप:- मी त्या प्रत्येकाचा ऋणी आहे ज्यांनी मला भर...