भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण - भाग १

 सागरी सस्तन प्राणी परिचय 



कोणाला सागरी सस्तन प्राणी म्हटल पाहिजे? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण ज्या विविध सागरी आधीवासात हे जीव राहतात त्यात कमालीची भिन्नता आहे त्याच बरोबर संशोधक मंडळी ज्या गटात या प्राण्याना एकत्र करतात त्यात देखील त्यांच्या रंग-रूप व आकार यात फार मोठा भेद दिसून येतो. परंतु काही मूलभूत जीवशास्त्रीय बाबी च्या गुणधर्मा अनुरूप आपण हे समजून घेतल तर समजण नक्कीच सोप होईल. 

  ज्याना पाठीचा कणा आहे व असे सागरी प्राणी जे  स्वतःच्या शरीराचा तापमान नियंत्रित करू शकतात (गरम रक्ताचे प्राणी), जे फुफुसाच्या साह्याने श्वास घेऊ शकतात त्याच बरोबर जे स्वतःच्या लहान पिल्लांना दूध देतात अश्या असे सारे गुणधर्म असलेल्या प्राणी गटांना सागरी सस्तन प्राणी असे म्हणतात. सस्तन प्राणी या वर्गात (class) असलेले सागरी सस्तन प्राण्यांना मुख्यता चार गटात विभागले गेले आहेत. 

१) Cetaceans (देवमासे, डॉल्फिन ई.) 

२) Sirenians (समुद्री गाय)  

३) Pinnipeds (सील, सी-लायन ई.)      

४) Fissipeds (पानमांजर आणि द्रुविय अस्वल)     

  सागरी सस्तन प्राणी महासागरी अधिवास आणि अन्नसाखळी मध्ये महत्वाची भूमिका बजावतात त्याच बरोबर या प्राण्याची संख्या कमी किंवा अधिक झाली तरी देखील त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतात. आपण समुद्र किनारी राहत असो किंवा अगदी पर्वत शिखरांवर परंतु सर्वांना आवश्यक असा  प्राणवायू चा सगळ्यात मोठा स्त्रोत म्हणजे आपली महासागरे आणि त्यात आढळणारे प्लवक सारखे सूक्ष्म जीव आणि इतर वनस्पति आहेत. त्यामुळेच पर्यायाने सागरी सस्तन प्राणी जर मुबलकतेने आपल्या महासागरात आहेत तरच ही गुंतगुंतीची अन्नसाखळी सुरळीत चालेल. जीव-विज्ञानाच्या भाषेत बोलायच तर सागरी सस्तन प्राणी ह्या कि-स्टोन प्रजाती आहेत म्हणजे असा सागरी जीवांचा समूह ज्यांना जर काही धोका पोहचला तर संपूर्ण सागरी अधिवासात योग्य पद्धतीने चाललेली अन्नसाखळी असंतुलित होईल. म्हणूनच या सागरी सस्तन प्राणी वर्गाला जितके आपण आधिक प्रलभत्तेने समजून घेऊ तितके संतुलित सागरी आधिवास आपणांस संवर्धित आणि संरक्षित करता येतील.  

  उथळ किनारी समुद्री क्षेत्र जेथे पाण्याची खोली (<२० मीटर पेक्षा कमी) असते तेथे समुद्री गाय (Dugong dugon) आढळून येते व हे जीव साधारण आपल्या नेहमीच्या जागेपासून फारसे दूर स्थलांतर करत नाही परंतु एका अभ्यासा दरम्यान सॅटलाइट टॅग लावलेला हा जीव जवळपास ६०० किमी अंतर पार करून पुन्हा आपल्या मुळजागी परत आला याची नोंद करण्यात आली(1). २००३ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासा दरम्यान एक ह्म्पबॅक व्हेल १४९ दिवसात जवळपास १०,४८१ किमी अंतर पार करते असे दिसून आले(2). एवढं प्रचंड अंतर सहजतेने पार करणारे सस्तन प्राणी या प्रवासा दरम्यान आपलं भरण-पोषण तर नक्कीच करतात परंतु त्यांचे हे स्थलांतरंण इतर सागरी जीव आणि सागरी अधिवास पोषक करत असतात. 

  जगभरात आतापर्यंत १३५ सागरी सस्तन प्रजातींची नोंद करण्यात आली आहे ज्यातील २८ सागरी सस्तन प्रजाती आपल्या भारतीय सागरी क्षेत्रात आहेत असे नोंदवण्यात आले आहेत. प्रत्येक प्रजाती ही आपल्या खास रचना, रंग आणि सवयी आणि आधिवास म्हणून खूप खास आहे.     

(क्रमश )

पुढील भाग येतो लवकरच आपल्या भेटीला 


- लेखक 

प्रदिप नामदेव चोगले 

    केरळ, ०३आगस्ट २०२२       





संदर्भ :- 

1. Corkeron, P. J., & Van Parijs, S. M. (2001). Marine mammal migrations and movement patterns. Page No. 479

2. Lagerquist, B. A., Mate, B. R., Ortega‐Ortiz, J. G., Winsor, M., & Urbán‐Ramirez, J. (2008). Migratory movements and surfacing rates of humpback whales (Megaptera novaeangliae) satellite tagged at Socorro Island, Mexico. Marine Mammal Science, 24(4), 815-830.      

3. Image reference: - https://in.pinterest.com/pin/88664686404690185/




आपणांस हा लेख आवडल्यास आपली प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा..              


Comments

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५