भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग २

लांब-चोचीचा सामान्य डॉल्फिन ( Delphinus capensis ) जगभरात डेल्फीनीडे वा सोप्या शब्दात बोलायचं तर डॉल्फिन या कुळात (Family) ३७ प्रजाती असल्याची सागरी अभ्यासक मंडळी ने नोंद केली आहे. यातील १५ डॉल्फिन प्रजाती आपल्या भारतीय सागरी क्षेत्रात विचरण करतात असा आतापर्यंत च्या सागरी निरीक्षण दरम्यान आपणांस दिसून आलं आहे. या लेख मालिकेच्या माध्यमातून आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करू. आज आपण ज्या डॉल्फिन प्रजाती ला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच नाव आहे लॉन्ग-बिक कॉमन डॉल्फिन यांस आपण ‘लांब-चोचीचा सामान्य डॉल्फिन’ असं संबोधू. याचं शास्त्रीय नाव Delphinus capensis असं आहे. या डॉल्फिन प्राजतीचं वजन साधारण ७२-२२६ किलो, लांबी ६-८.५ फुट तर सरासरी ४० वर्ष इतकं त्याच आयुर्मान असतं. शरीराच्या लांबी बद्दल एक महत्वाची विशेष बाब म्हणजे या प्रजातीतील नर डॉल्फिन हे मादी डॉल्फिन च्या तुलनेने निदान ५% लांब असतात. इतर डॉल्फिन प्रजाती सोबत जर आपण या प्राजाती ची तुलना करता यांची चोच थोडी लांब असते ज्यात ४७-६७ छोटे परंतु टोकदार दात प्रत्येकी वरच्या आणि खालच्या जबड्यात असतात....