समुद्र संवर्धन लेख मालिका - ३

 अजस्त्र सागरी जीव-समूह, मासेमारी आणि संवर्धन पूरक उपाययोजना




वर्ष २०१९ मध्ये केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागा मार्फत प्रकाशित झालेल्या एका अहवाल अनुसार भारतात ३.८ दक्षलक्ष सक्रिय मासेमार आहेत असे नमूद करण्यात आले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात जर मासेमारी आपल्या भारतीय सागरी क्षेत्रात होत असेल तर आपल्याला अंदाज येईल की किती नानाविधी प्रकारचे सागरी जीव आपल्या येथे पकडले जात असतील. मासेमारी करताना जे मासे विक्री आणि खान-पान म्हणून पकडले जातात त्यांच महत्व आणि प्रचंड आर्थिक मूल्य आहे. परंतु मासेमारी करताना काही सागरी जीव हे नकळत वा उद्देश न ठरवता पकडले जातात त्यांस उपपक्कड किंवा कुटा (Bycatch) असे म्हणतात. काही सागरी जीव ज्यात अंतर्भाव होतो आकाराने मोठे असे पाकट (Rays), मोठे मोरी मासे वा मुशी(Sharks), सागरी सस्तन प्राणी जसे की देवमासे आणि डॉल्फिन(Marine mammals), सागरी कासव(Sea turtles) आणि समुद्री पक्षी जसे की बूबी आणि समुद्री कावळे ई.(Sea Birds) यांना एका खास अश्या वैज्ञानिक शब्दावली ओळखले जाते ज्यास ‘अजस्त्र सागरी जीव-समूह’ वा मरीन मेगा फाऊना (Marine megafuna) असे म्हटले जाते. सदर लेखाच्या माध्यमातून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की कोणत्या स्वरूपात आपण मासेमारी आणि अजस्त्र सागरी जीव-समूह यांमध्ये तारतम्य बाळगून चिरंतन मासेमारी आणि समुद्र संवर्धनाच्या दिशेन आगेचूक करू शकतो.
  सागरी आधिवासात अजस्त्र सागरी जीव-समूह मध्ये अंतर्भाव होणारे सगळे सागरी जीव अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावतात. यांमध्ये प्रामुख्याने जर काही महत्वाचे असेल तर ते म्हणजे सागरी आधिवासात आणि सागरी अन्न-साखळी मध्ये त्याची सर्वात उच्च स्थानी आणि मध्यम स्थानी असलेली भूमिका. उदाहरणार्थ अजस्त्र मोठे सागरी देवमासे, किलर व्हेल सारखे डॉल्फिन प्रजाती आणि व्हेल-शार्क सारखे अजस्त्र जीव खूप मोठ्या प्रमाणात इतर सागरी जीव आणि आणि प्लवक खाऊन आपली उपजीविका बजावतात यांमुळेच मोठ्या प्रमाणात सागरी आधीवासात सजीवांची संख्या आणि अन्न साठा नियंत्रित राहण्यास मदत होते. या सगळ्या प्रक्रिये च्या माध्यमातून ऊर्जेचे प्रवाहितता आणि कार्यशीलता समुदी आधीवासात टिकून राहते. काही सागरी कासव प्रजाती जसे की हिरवे समुद्री कासव आणि समुद्री गाय (Dugong) मोठ्या प्रमाणात सागरी शेवाळ आणि समुद्री गवत यांवर आपली उपजीविका निभवतात त्यांमुळे समुद्री आधीवासात मोठ्या प्रमाणात उर्जेचा पुनर्ववापर आणि सुपीकता वाढीस लागते.     
  जगभरात दरवर्षी साधारण वर्षाला जवळपास २० दशलक्ष इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्लभ, संरक्षित आणि महत्वपूर्ण सागरी जीव मासेमारी करताना पकडले जातात. यातील काही नियोजन पूर्वक पकडले जातात तर काही असेच नियोजनशून्यतेतून पकडले जातात. अजस्त्र सागरी जीव-समूह गटात मोडणारे कित्येक जीव या प्रक्रिये मध्ये सापडून जखमी अथवा मृत होतात. यावर काही उपाय योजना करायच्या असं म्हटलं तर मिलनर आणि गुलाड या शास्त्रज्ञ मंडळी ने काही उपाय योजना सांगितल्या आहेत. 
१) काही हंगाम आणि ठराविक प्रदेशानरुप मासेमारी वर बंदी करणे. जेणेकरून त्या वेळेत मत्स्य साठयामध्ये वाढहोईल आणि उपपक्कड किंवा कुटा याचं प्रमाण कमी होईल. 
२) मासेमारी करणाऱ्या बोटि आणि मासेमारी जाळी यांमध्ये तांत्रिक बद्दल करून उपपक्कड कमी करणे आणि अजस्त्र सागरी जीव-समूह यांना संरक्षण देणे. उदाहरणार्थ (TED) वा टर्टल एकसलुडईनग यंत्र निर्मिती ई.    
३) मासेमारी जाळ्यात अडकलेले संरक्षित मत्स्य प्रजाती आणि अजस्त्र सागरी जीव-समूह जसे की समुद्री कासवे आणि सागरी सस्तन प्राणी यांची जिवंत असताना सुटका करून पुन्हा योग्य काळजीसह समुद्रात सोडून देणे. 
४) विविध माध्यमातून मासेमारी बद्दल सकारात्मक परिणाम करण्यासाठी विविध उपाययोजना करणे.

  वर नमूद करण्यात आलेल्या उपाययोजना च्या व्यतिरिक्त मासेमारी करणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मंडळी यांचा मासेमारी सोबतचा सहसबंध जर आपण समजून घेतला तर आणखी काही गोष्टी समुद्र सवर्धनाच्या दृष्टिकोनातून आपण करू शकतो.
   या लेख मालिकेच्या पुढील भागात आपण त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न नक्की करू . 
  आधिक माहितीसाठी संदर्भ म्हणून काही शोधनिबंध शीर्षक खाली दिले आहेत. गुगल स्कॉलर वर आपांसास पाहिजे असेली संदर्भ शीर्षक कॉपी करून सर्च करा आणि सविस्तर रीत्या वाचा. हा लेख आपांसास कसा वाटला हे खाली कमेन्ट मध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. 

लेखक 
- प्रदिप नामदेव चोगले 
मोबाईल ९०२९१४५१७७
pradipnc93@gmail.com 
दिनांक २२ सप्टेंबर २०२२ 
केरळ

 
  
  

संदर्भ; - 
Department of Fisheries, Ministry of Fisheries, Animal Husbandry and Dairying (2019). Handbook on Fisheries Statistics 2018. New Delhi: Department of Fisheries, Ministry of Fisheries, Animal Husbandry and Dairying, 190.
Salmin, Y. N., Jiddawi, N. S., Gray, T., Temple, A. J., & Stead, S. M. (2019). Improving bycatch mitigation measures for marine megafauna in Zanzibar, Tanzania. Western Indian Ocean Journal of Marine Science, 18(1), 19-28.
Bowen W (1997) Role of marine mammals in aquatic ecosystems. Marine Ecology Progress Series 158: 267– 274 [doi.org/10.3354/meps158267]
Preen A (1995) Cultivation grazing. Marine Ecology Progress Series 124: 201-213
Heithaus MR, Frid A, Wirsing AJ, Worm B (2008) Predicting ecological consequences of marine top predator declines. Trends in Ecology and Evolution 356: 43-51 [doi.org/10.1016/j.tree.2008.01.003]
Bujang, J. S., Zakaria, M. H., & Arshad, A. (2006). Distribution and significance of seagrass ecosystems in Malaysia. Aquatic Ecosystem Health & Management, 9(2), 203-214.
Pérez Roda, M. A., Gilman, E., Huntington, T., Kennelly, S. J., Suuronen, P., Chaloupka, M., et al. (2019). A Third Assessment of Global Marine Fisheries Discards. FAO Fisheries and Aquaculture Technical Paper No. 633. Rome: Food and Agricultural Organization of the United Nations, 79.
- https://pradipnchogale.blogspot.com/2022/05/blog-post.html


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५