
तिच्या साठी त्याची गोष्ट तो आणि ती यांची गोष्ट तशी फार जुनी, पण तितकीच ती नवीन आहे I एडन च्या बागेत तो आदम आणि ती इव होती, मानवी सभ्यतेच्या सृजनाची ती वीण होती II १ II तो कधी पती म्हणून तीची जन्मभर सोबत करतो, पत्नी म्हणून कधी ती आजन्म त्याला हिंमत देते I कधी तरी तो तिला भोग समजून उपभोगत असतो सहनशीलतेची मूर्ती बनून ती त्याला पूजत असते II २ II कधी तरी तो भाऊ बनून तिच्या साठी दुनियेशी लढतो ती मग सासरी जाताना त्याची बहीण म्हणून हंबरते I नसते ज्याला कोणी अशी पाठराखीव बहीण त्याचं दुःख तो हरघडी पचवतो वेड्या बहिणीची वेडी माया त्याला भाऊबीजेला रडवते II ३ II तो जेव्हा तिचा मित्र असतो तेव्हा मैत्री मध्ये जादूगरी विलक्षण असते दुनियादारी कशी असो तिला माहीत असते तो तिच्या साठी मरमिटने वाला जिगरी यार आहे I एका मुलीची एका मुलासोबत असलेली मैत्रीची घट्ट वीण कधीच दुनिया समजत नाही म्हणूनच आज देखील भिन्न लिंगी व्यक्ती ची सहज जोडी नाही II ४ II तो कठोर, भांडख...