तिच्या साठी त्याची गोष्ट



तो आणि ती यांची गोष्ट तशी फार जुनी,

   पण तितकीच ती नवीन आहे  I

एडन च्या बागेत तो आदम आणि ती इव होती,

   मानवी सभ्यतेच्या सृजनाची ती वीण होती  II १ II 


तो कधी पती म्हणून तीची जन्मभर सोबत करतो,

  पत्नी म्हणून कधी ती आजन्म त्याला हिंमत देते  I 

कधी तरी तो तिला भोग समजून उपभोगत असतो

  सहनशीलतेची मूर्ती बनून ती त्याला पूजत असते  II २ II 


कधी तरी तो भाऊ बनून तिच्या साठी दुनियेशी लढतो

 ती मग सासरी जाताना त्याची बहीण म्हणून हंबरते I 

नसते ज्याला कोणी अशी पाठराखीव बहीण त्याचं दुःख तो हरघडी पचवतो

 वेड्या बहिणीची वेडी माया त्याला भाऊबीजेला रडवते  II ३ II 


तो जेव्हा तिचा मित्र असतो तेव्हा मैत्री मध्ये जादूगरी विलक्षण असते

 दुनियादारी कशी असो तिला माहीत असते तो तिच्या साठी मरमिटने वाला जिगरी यार आहे  I 

एका मुलीची एका मुलासोबत असलेली मैत्रीची घट्ट वीण कधीच दुनिया समजत नाही

म्हणूनच आज देखील भिन्न लिंगी व्यक्ती ची सहज जोडी नाही  II ४ II 


तो कठोर, भांडखोर, चिडचिडा, मेहनती असतो हे साऱ्यांना ठाव असतं

  पण त्याचा आत देखील लेकी साठी एकांतात सतत उद्विग्न काळजी वाहू ह्रदय वसलेलं अज्ञात असतं  I 

  तो कधी चारचौघात रडत नाही, नाही कधी बेजबाबदार पणे वागतो

  माहीत असते त्याला सदोदित एका मुलीच्या तो बाप असतो  II ५ II 


तिची आणि त्याची गुंफण समजायला तशी अवघड असते

 कारण तो समजून घ्यायला ती आणि ती समजायला तो व्हावं लागतं I 

मी करतो आहे प्रयत्न मित्र, मुलगा, पती आणि बाप म्हणून तिला समजून घ्यायचा

फक्त एक सांगतो मी देखील तिला तुही समजून घे जरा बाप म्हणून विशेष मला  II ६ II 


~ कवी

प्रदिप नामदेव चोगले

मोबाईल क्रमांक ९०२९१४५१७७

pradipnc93@gmail.com

दिनांक २२जानेवारी २०२३

कल्याण-कुलाबा प्रवास

 संदर्भ : - 
संदर्भ चित्र _ https://in.pinterest.com/pin/330240585188899462/

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५