महितीपटाच्या माध्यमातून  समजुन घेऊ MPA


  शाळेमध्ये विदयार्थी म्हणून असताना   “जीवो जीवस्य जीवनम्”  ह्या संकल्पनेचा आपणांस नक्कीच विज्ञानाच्या पुस्तकात परिचय झाला असेल. श्रीमद्भागवत पुराण प्रथम स्कँध, तेरावा अध्याय , श्लोक सेहचालीस मध्ये याचा उगम सापडतो. या श्लोकाचा अर्थ काय? याचा मागोवा जर आपण घेतला तर विविध तज्ञ व्यक्ती त्याचा अर्थ निरनिराळा सांगतील. परन्तु सजीवांचा परस्परांशी असलेला  जगण्यास आवश्यक सहसबंध महत्वाचा आहे ही बाब आपण विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून यातून अधोरेखित करू शकतो. जगभरात सध्या वाढत जाणारे तापमान, जागतिक हवामान बदल, आम्लीय पर्जन, वाढती वृक्ष तोड या बाबत विविध प्रसार माध्यमातून आपण नेहेमी वाचत असतो. या गोष्टी आपल्या वर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रित्या परिणाम करत असतात भले आपण समुद्र किनारी राहत असो की ध्रुवीय क्षेत्रात या साऱ्या गोष्टी आपल्यावर नक्कीच परिणाम करत असतात.
  नुकतीच मी अंटाआर्टिक पेनीसुला आणि प्रिस्टीन सी यांच्या नॅशनल जियोग्राफी सोबत संयुक्त सागरी मोहीम यांवर आधारित एक माहितीपट पहिला. मानवी वस्ती आणि दैनंदिन प्रदूषण यांपासून कित्येक हजारो किलोमीटर दूर असलेल्या अंटाआर्टिक सारख्या संवेदनशील भूभागावर आपल्या रोजच्या कृतींमुळे काय भयानक परिणाम होतो याचा उपपोह करणाऱ्या बाबी या महितीपटामध्ये अतिशय सोप्या रित्या चित्रित केल्या आहेत. अर्जेंटिना आणि चिली या दोन देशाच्या एकत्र समुद्र संवर्धन धोरणाचा परिणाम म्हणजे या महितीपटाची निर्मिती. अंटाआर्टिक सारख्या दुर्गम ठिकाणी जगभरातील विविध देश आपले संशोधन कार्य करत आहेत कारण या येथे असलेले नेसर्गिक अधिवास काही जीवशास्त्रीय प्रश्नांची उकल समजून घेण्यासाठी उत्तम प्रयोगशाळा आहेत. जवळपास ५०-६० वर्षांपूर्वी इंधन म्हणून हमबॅक व्हेल आणि इतर सागरी सस्तन प्राण्यांची येथे मोठ्या प्रमाणत शिकार करण्यात आली त्यामुळे जवळपास या क्षेत्रातील ९०% हुन अधिक व्हेल ची संख्या कमी झाली. १९६० नंतर विविध आंतराष्ट्रीय करार यामुळे या व्यापारी तत्वावर चाललेल्या व्हेल च्या शिकारी वर बंदी घालण्यात आली. त्याचा परिणाम म्हणजे आज पाच दशकानंतर व्हेल ची संख्या येथे आता वर्षाला ७-८% च्या दराने वाढत आहे. आता व्हेलिंग बंद आहे परंतु व्हेल आणि इतर सागरी जीव यांसाठी आवश्यक असलेले सागरी पर्यावरण मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मासेमारी आणि पर्यटन यामुळे धोक्यात आले आहे. क्रिल या कोळंबी सारख्या छोट्या प्राण्यांवर व्हेल सारखे अजस्त्र सागरी जीव आपली भूक भागवत असतात. यातील कित्येक व्हेल जवळपास ८००० किमी किंवा त्या हुन अधिक अंतर पार करून दर वर्षी येथे येतात. त्याच बरोबर सील, सीलायन आणि पेंग्विन सारखे सुंदर जीव देखील या क्रिल वर प्रत्क्षय व अप्रतक्ष्य रित्या विसंबून आहेत. पण सध्या असलेला मानवी हस्तक्षेप आणि जगभरात मोठ्या प्रमाणात होणारी जीवाष्म इंधनाचे ज्वलन या बाबी येथील हिमनग वेगाने वितळवण्यास कारणीभूत आहेत. अश्या वेळी गरज आहे एकीचे बळ अर्थात विविध राष्ट्राच्या संयुक्त प्रयत्नांची. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे संरक्षित सागरी क्षेत्र म्हणजे मारिन प्रोटेकटेट एरिया (MPA) ही संकल्पना. जर आपणांस ही संकल्पना समजून घ्यायची असेल तर नक्कीच आपण हा माहितीपट पहावा हीच विनंती. 
  आपल्या मित्र मंडळी आणि परिवारात हा लेख आणि सोबत असलेली या महितीपटाची लिंक शेअर करा. म्हणजे आपण आपल्या सभोवती बदलत असणारा निसर्ग आणि त्याला संवर्धन करण्याचे प्रयत्न समजू शकतो. आपणांस हा लेख कसा वाटला आणि हा माहितीपट आवडला की नाही हे खाली कमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया लिहून व्यक्त करा. 


- लेखन 

प्रदिप नामदेव चोगले

मोबाईल क्रमांक ९०२९१४५१७७

 pradipnc93@gmail. com

दिनांक २१ जानेवारी २०२३, मुबंई


माहितीपटाची वेब लिंक 

THE ANTARCTIC PENINSULA | NATIONAL GEOGRAPHIC PRISTINE SEAS

https://www.youtube.com/watch?v=IZzHwQ9F3UA




Comments

  1. Replies
    1. https://www.youtube.com/watch?v=IZzHwQ9F3UA

      ही लिंक कॉपी करून यूट्युब वर आपण ही फिल्म पाहू शकता.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५