Posts

Showing posts from March, 2023

माझ्या कविता

Image
प्रस्तावना: -  वाचक दोस्तहो आपल्या अवती-भवती सर्वत्र सध्या विकास कामांचा धुडगूस चालू आहे. शहर स्मार्ट आणि गावे मॉर्डन होत आहेत. परंतु यात आपण जाणीवपूर्वक रीत्या गाणारे पक्षी, भिरभिरणारी फुलपाखरे, पावसातील चिखल-मातीचा सुवास यांना दूर सारत आहोत. माझी सदर कविता  'गुलमोहर टेकडी' हि या बद्दल माझा अनुभव मांडत आहे. मला नक्कीच जाणीव आहे आपला हि असाच काहीसा वर्तमान अनुभव असेल.........       गुलमोहर टेकडी काळ्या चकचकीत डांबरी सडकेवर आजकाल दुपार फार असह्य होते   I निदान ते तरी बरं कारण शहरातील तो गुळगुळीत क्राक्रीट रोड तुलनेने अधिक आग ओकत असतो II १ II रामवाडीची ती गुलमोहर टेकडी आजकाल गुलमोहरी ला मुकली आहे  I कारण रुंदावणारा मुबंई-अलिबाग महामार्ग तिला सतत मागे सारत आहे II२II उन्हात सावली मला, तिला आणि त्याला साऱ्यांना हवीहवीशी वाटते  I पण तिची निर्मिती करणारी वृक्षराजी आम्हाला आजकाल अडचणीची ठरते II३II कोकीळ आता कधी तरीच कुहुकुहू करते, कारण किनारी असलेली अंबराई आता तिथे नाही  I नाही तिथे उरली आहेत ती चिमुकली पाणवठे नाही खळखळणार ओढा II४II चित्र फार विदारक झालं आहे आठवणीतील लोभस मामाच्या गावा

समुद्र संवर्धन लेख मालिका - ४

Image
  समृद्ध कोकण आणि धगधगता विकास   कधी-कधी काही गोष्टी आपण ज्या अनुभवतो त्या बाबत जर सजगतेने विचार केला तर नक्कीच आपल्या मधील बहुतेकांना आपण फार नशीबवान आहोत याची प्रचिती नक्कीच येईल. फेब्रुवारी २०२३ चा महिना हा माझ्यासाठी याच प्रमाणे अगदी भरभरून अनुभवाचं गाठोडं देऊन गेला. जवळपास ८५०-१००० किमी इतकं अंतर, २३ दिवस आणि शेकडो माणसाच्या गाठी-भेटी, प्रदीर्घ चर्चा, कोकणचा समृद्ध समुद्र किनारा आणि रीती-भाती सोबतीला मनपसंत चवदार जेवण यांनी या संशोधन सफरीची मज्जा गडद केली. इतक्या सुंदर आठवणींना मात्र कधी-कधी  किनार लाभली भेसूर सत्याची. कोकण सुंदर आहे परंतु म्हणूनच आज ते विकास प्रकल्पाच्या आणि चुकीच्या पर्यटन धोरणांचा बळी ठरत आहे. अजून तरी आपण पुष्कळ काही करू शकतो या निसर्ग समृद्ध कोकणातील संस्कृती आणि जैवविविधता टिकवण्यासाठी. पण आज करण्याची गोष्ट उद्यावर टाकली तर मात्र हे चित्र बदलून जाईल. मग मात्र आपल्या दिसतील या कोकणात सर्वत्र  समुद्र किनारी साचलेला कचरा आणि पर्यटनाच्या नावाखाली जगोजागी उभे होत जाणारी हॉटेल व्यवस्था, मोठं मोठी तेलशुद्धी  प्रकल्प आणि अजस्त्र पोर्ट सोबतीला ज्याचं गावपण संपल असेल