माझ्या कविता

प्रस्तावना: -  वाचक दोस्तहो आपल्या अवती-भवती सर्वत्र सध्या विकास कामांचा धुडगूस चालू आहे. शहर स्मार्ट आणि गावे मॉर्डन होत आहेत. परंतु यात आपण जाणीवपूर्वक रीत्या गाणारे पक्षी, भिरभिरणारी फुलपाखरे, पावसातील चिखल-मातीचा सुवास यांना दूर सारत आहोत. माझी सदर कविता  'गुलमोहर टेकडी' हि या बद्दल माझा अनुभव मांडत आहे. मला नक्कीच जाणीव आहे आपला हि असाच काहीसा वर्तमान अनुभव असेल......... 


    

गुलमोहर टेकडी


काळ्या चकचकीत डांबरी सडकेवर आजकाल दुपार फार असह्य होते   I
निदान ते तरी बरं कारण शहरातील तो गुळगुळीत क्राक्रीट रोड तुलनेने अधिक आग ओकत असतो II १ II


रामवाडीची ती गुलमोहर टेकडी आजकाल गुलमोहरी ला मुकली आहे  I
कारण रुंदावणारा मुबंई-अलिबाग महामार्ग तिला सतत मागे सारत आहे II२II


उन्हात सावली मला, तिला आणि त्याला साऱ्यांना हवीहवीशी वाटते  I
पण तिची निर्मिती करणारी वृक्षराजी आम्हाला आजकाल अडचणीची ठरते II३II


कोकीळ आता कधी तरीच कुहुकुहू करते, कारण किनारी असलेली अंबराई आता तिथे नाही  I
नाही तिथे उरली आहेत ती चिमुकली पाणवठे नाही खळखळणार ओढा II४II


चित्र फार विदारक झालं आहे आठवणीतील लोभस मामाच्या गावाचे  I
हसू मात्र तेव्हा येते जेव्हा कोणी अमका-ढमका बिल्डर तिथे आटपाट नगराचे होर्डिंग लावतो II५II


आम्हाला आजकाल स्मार्ट शहर आणि मॉडर्न गावे हवीहवशी वाटतात I
चिखल, बेडूक, गांडूल, साप आणि मातीच्या सुगधं ज्यात नसतो त्या पेवरब्लॉगची II६II


इमारती आणि घराच्या भिंती आता अल्युमिनिम आणि स्टील च्या पारदर्शक झाल्या आहेत  I
दुःख याच फार जास्त आहे की माणसाची मन आणि बुद्धी मात्र रोज रुपयाने झाकत चालली आहे  II७II


अजून मी तरी फार आशावादी पावले उचलत निसर्ग संवर्धनाची गाथा गातोय
फार थोडे दिवस आहेत आपले इथे म्हणून मी वाचवतोय थोडे झरे थोडेसे सागर किनारे  II८II


- सागरपुत्र (प्रदिप नामदेव चोगले)
-  कल्याण - मुबंई प्रवास 
-  दिनांक ११/०३/२०२३....
-  ०४.२० सायंकाळ



Comments

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५