भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग ८
.jpg)
ब्रूडीज व्हेल - सोबती आपल्या सागर किनारी प्रदेशाचा (भाग २) आपल्या भारतीय समुद्रातील ब्रूडीज व्हेल इतर देशांतील त्याच प्रजातीपेक्षा वेगळ्या असल्याचे एका नव्या आंतरराष्ट्रीय संशोधनात (Kershaw et al., 2013) सिद्ध झाले आहे. संशोधकांनी भारताच्या शेजारील ओमान, मालदीव आणि बांगलादेशच्या समुद्रातील ब्रूडीज व्हेलच्या डीएनएचा अभ्यास करून दोन मुख्य प्रकार ओळखले - किनाऱ्यापासून दूर खोल समुद्रात राहणारी मोठी व्हेल्स आणि किनाऱ्याजवळ उथळ पाण्यात राहणारी लहान व्हेल्स. विशेष म्हणजे उत्तर हिंदी महासागरातील (ओमान आणि बांगलादेशजवळील) किनारी व्हेल्स जपानच्या व्हेल्सपेक्षा पूर्णपणे वेगळ्या जनुकीय गटात मोडतात, म्हणजेच आपल्या किनाऱ्याजवळील व्हेल्स हा एक अद्वितीय समूह आहे. हा शोध महत्त्वाचा आहे कारण मासेमारीच्या जाळ्यात अडकणे, जहाजांशी टक्कर आणि समुद्रप्रदूषण यामुळे या व्हेल्स धोक्यात आहेत. आपल्या किनाऱ्याजवळील व्हेल्स स्वतंत्र गट असल्याने त्यांच्या संवर्धनासाठी विशेष योजना आखणे गरजेचे आहे. भारताच्या मुख्य भूभागाजवळील या व्हेल्सवर अधिक संशोधन करणे आवश्यक असले तरी हा अभ्यास आपल्याला या अद...