भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग ७
ब्रूडीज व्हेल - सोबती आपल्या सागर किनारी प्रदेशाचा
अशी कोणती व्हेल प्रजाती आहे जी महाराष्ट्राच्या सागर किनारी आणि थोडे पुढे खोल पाण्यात सगळ्यात जास्त वेळा दिसत असेल तर ती आहे 'ब्रूडीज व्हेल'. आश्चर्य आणि चमत्कार या व्हेल बद्दल काय तर ती बऱ्याच वेळा मच्छिमार बाधंवाना मासेमारी करताना दिसते. कधी किनारी तर कधी लगतच्या खोल समुद्रात , तर बऱ्याच वेळा ती सागर किनारी वाहून येते जिवंत किंवा मृत अवस्थेत. पण तरी देखील या बद्दल आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून हवी तेवढी माहिती आपल्या कडे अजून नाही.
आज देखील ब्रुडीज (Bryde's whale) च्या दोन उप जाती आहेत कि नाही या बद्दल थोडं वैज्ञानिक मंडळी मध्ये देखील मतभेद आहेत. सध्या उपलब्ध संशोधन अहवाल आणि लेख या अनुसार आपण त्यांना त्यांच्या आकारवरून दोन उप जातीत विभागनी करू शकतो. आकाराने थोडी मोठी असलेली व्हेल आहे Bryde’s whale (Balaenoptera edeni brydei) आणि थोडी लहान असलेली Eden’s whale (Balaenoptera edeni edeni). यातील एङणी व्हेल बहुधा किनाऱ्या पासून दूर आणि खोल पाण्यात आढळते विशेषता. किंबहुना आज देखील बऱ्याच वेळा वैज्ञानिक मंडळी किंवा आंतराष्ट्रीय व्हेलिंग कमिशन देखील Balaenoptera edeni हे नाव एडणी किंवा ब्रुडीज व्हेल साठी वापरते. आता आपण या व्हेल च्या इतर पैलु बद्दल काही गोष्टी जाणून घेऊया.
बऱ्याच मोठ्या कालावधी पर्यंत व्हेल ची शिकार करणारे शिकारी आणि समुद्री संशोधक ह्या व्हेल च्या शरीर आकार, रंग आणि रचना याना पाहता ब्रुडीज व्हेल आणि सी व्हेल व्हेल मध्ये गल्लत करत असत. परुंतु आज ह्या व्हेल ची ओळख पटवणं सोपं झाले आहेत. त्यासाठी संशोधनक मंडळीनी काही ठोकताळे नक्की केले आहेत. ब्रुडीज व्हेल्सचं अंग अतिशय सुडौल आणि चिकट आकाराचं असतं. बहुतेक ब्रुडीज व्हेल्सच्या तोंडावर (रोस्टरम/चोचीसारखा वरचा जबडा किंवा भाग) तीन स्पष्ट उंचरंगाच्या पट्ट्या असतात . इतर रॉरक्वल प्रजातींमध्ये साधारणपणे फक्त एकच पट्टी आढळते. रॉरक्वल्स" म्हणजे ब्लू व्हेल, हंपबॅक व्हेल सारख्या गटातील विशिष्ट व्हेल्स, ज्यांच्या डोक्यावर विशेष पट्ट्या असतात. ब्राइड व्हेलचं डोकं वरून पाहिलं तर काहीसं तीक्ष्ण आणि निमुळतं असतं. त्याचं डोकं संपूर्ण शरीराच्या लांबीच्या जवळपास २५% इतकं मोठं असतं. त्याच्या पाठीवरील पर (डोर्सल फिन) उंच आणि वक्र (फाल्केट) आकाराचं असतं, आणि ते अचानक पाठीवरून बाहेर येतं. हे वैशिष्ट्य ब्रुडीज व्हेलला इतर प्रजातींपासून ओळखायला मदत करतं.
तसेच त्यांच्या अंगावर "काउंटर-शेडिंग" (वरपासून खोल राखट, तर पोटाकडे फिकट) अशी रंगसंगत दिसते. पाठीचा भाग गडद राखट तर पोटाचा भाग हलक्या रंगाचा असतो. कधीकधी पोटाच्या पांढऱ्या भागावर गुलाबी छटाही दिसू शकते. एक मजेदार वैशिष्ट्य: या व्हेल्सच्या शरीरावर अंडाकार चरा/खुणा (स्कार्स) असतात. ह्या खुणा "कुकीकटर शार्क" या छोट्या पण धाडसी शार्कंनी केलेल्या चाव्यांचे व्रण असतात.
ब्रुडीज / ब्राइड व्हेलच्या वरच्या जबड्यावर आणि ओठांवर साधारणपणे एकसमान गडद रंग असतो. त्यांच्या घशावर ४० ते ७० पर्यंत पट्ट्या (throat pleats) असतात, जे नाभीपर्यंत किंवा त्यापुढेही पसरलेले असू शकतात. हे पट्टे त्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आणि अन्न गिळण्यास मदत करतात. त्यांच्या तोंडात २५० ते ३७० जोड्या राखट रंगाच्या बेलीन प्लेट्स (कर्परपट्ट्या) असतात, ज्यांच्या काठावर फिकट राखट रेशीमसारखे केस (fringes) असतात. हे केस जाड आणि खरखरीत स्वरूपाचे असतात, जे पाण्यातून लहान मासे आणि क्रिल्स (सागरी जीव) गाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. ब्रुडीज व्हेलचा आकार प्रचंड असतो, पण त्यात हि मादी नराच्या तुलनेने मोठी असते. नर व्हेल १५ मीटर इतकी लांब असते याची तुलना करता जवळपास ५ मजली इमारतीएवढी वाढू शकते. तर मादी त्याहूनही मोठी १६.५ मीटर पर्यंत तुलना करता एका क्रिकेट पिचच्या निम्म्याहून अधिक लांबी एवढी असते. नवजात ब्रुडीज व्हेल जन्मतःच अंदाजे ४ मीटर (एका मोठ्या SUV पेक्षा जास्त लांब) लांब असते. एक पूर्णवाढ झालेली ब्राइड व्हेल जास्तीत जास्त ४०,००० किलोग्रॅम (म्हणजे अंदाजे ८ वयस्क हत्ती किंवा २५० मारुती ८०० कारं च्या मॉडल) इतकी जड असू शकते. ह्या प्रचंड वजनाचं रहस्य आहे त्यांची ब्लबर (चरबीचा थर) जो शरीराला उबदार ठेवतो आणि ऊर्जा साठवतो. ही चरबी त्यांच्या शरीराच्या ३०-४०% भागाची बनलेली असते.

ही प्रजाती जगभर पसरलेली असून तिने अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंद महासागरांमध्ये आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे. ब्राइड व्हेल्स ही समुद्रातील अत्यंत चपळ व सक्रिय शिकारी असून ती प्रामुख्याने पिलचर्ड, कोळंबी, पेदवे, बांगडा यांसारख्या गटामध्ये राहणाऱ्या मासळ्यांवर जगते, तसेच कधीकधी स्क्विड, क्रिल आणि इतर अकशेरुकी जीवही खाते. ही व्हेल्स "लंज फीडिंग" या अनोख्या पद्धतीने शिकार करतात, ज्यामध्ये ती पाण्यात जोरात झेप घेऊन मासे पकडते आणि अचानक दिशा बदलून चपळतेने हलणाऱ्या शिकारीला मात करते. त्यांच्या तोंडातील बेलीन प्लेट्स पाणी आणि अन्न वेगळे करण्यास मदत करतात, ज्यामुळे ते दररोज सुमारे ६०० किलो मासे खाऊ शकतात.
आता या व्हेल बद्दल आपल्या कडे कोणत्या पद्धतीची वैज्ञानिक माहिती उपलब्ध आहे त्या बद्दल एक नजर टाकू या.
सरोज, मुसलियारकम आणि इतर संशोधका टीम ने प्रकाशित केलेल्या लेखा अनुसार, भारताच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्यावर मृत अवस्थेत वाहून आलेल्या ब्राइड व्हेल (Balaenoptera brydei) आणि इडन व्हेल (Balaenoptera edeni) या जुळ्या दिसणाऱ्या प्रजातींचा डीएनए बारकोडिंग पद्धतीने अभ्यास केला. ह्या व्हेल्सचे शरीर मृत झाल्यावर बिघडत असल्यामुळे, पारंपारिक ओळख पद्धती अपुर्या पडत होत्या. संशोधनात भारतीय समुद्रात ब्राइड व्हेलच्या या दोन्ही उपजाती उपस्थितीचा पहिला निर्विवाद पुरावा मिळाला, तसेच दोन्ही प्रजातींमधील आनुवंशिक फरक स्पष्ट झाले. किनारी वाहून आलेल्या आणि मृत पावलेल्या व्हेल्सच्या नोंदी ठेवणे या प्रजातींच्या संवर्धनासाठी आणि लोकसंख्येच्या अभ्यासासाठी किती महत्त्वाचे आहे हे या संशोधनाने उघड केले आहे.
सुतारिया, सुले आणि इतर संशोधकांनी (२०१७) प्रकशित केलेल्या संशोधन आणि IWC वैज्ञानिक समितीत सादर केलेल्या अभ्यासानुसार, २००० - २०१६ पर्यंत महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर एकूण ७ व्हेल स्ट्रँडिंग (किनारी किंवा समुद्रात मृत/जिवंत वाहून येणे) घटना नोंदवल्या गेल्या, ज्यातील ३ ब्राइड व्हेल्स होत्या. २०१५-२०१६ दरम्यानच्या मच्छीमारांच्या अहवालांनुसार, विशेषतः पेदवे/तारली मासेमारीच्या हंगामात या व्हेल्सने किनाऱ्याजवळ (५०० मीटर पर्यंत) असामान्य वर्तन दाखवले - बोटींजवळ पृष्ठभागावर येणे, उड्या मारणे इ. संशोधकांच्या मते, हे वर्तन मासेमारीच्या कृती , अन्नाच्या उपलब्धतेत घट, प्लास्टिक प्रदूषण किंवा ध्वनीप्रदूषणाशी संबंधित असू शकते. ह्या स्ट्रँडिंग घटना समुद्री परिसंस्थेतील असंतुलनाचे संकेत देते, ज्यामुळे मच्छीमारीच्या जाळ्यांच्या योग्य वापरावर नियंत्रण, प्लास्टिक प्रदूषण रोखणे आणि स्थानिक सहभागातून निरीक्षण यंत्रणा विकसित करणे गरजेचे ठरते.
जोग, सुतारिया आणि सहसंशोधकांनी (२०२४) 'एंडेंजर्ड स्पीशीज रिसर्च' या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, सिंधुदुर्ग किनाऱ्यावर केलेल्या सर्वेक्षणांदरम्यान ब्राइड व्हेल्सची ५ वेळा निरीक्षणे नोंदवली गेली आहेत, जी या प्रजातीची स्थानिक उथळ किनारी पाण्यात (२.६ ते २६.४ मीटर खोली) उपस्थिती दर्शवतात. ही व्हेल्स सामान्यतः उष्ण समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय पाण्यात आढळत असून, या अभ्यासात त्या महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळ (०.०९ ते ६.७ किमी अंतरावर) दिवसाच्या प्रकाशात दिसून आल्या, ज्यामुळे त्यांच्या किनाऱ्याजवळच्या अधिवास वापरावर प्रकाश टाकला गेला. सक्रिय खाद्य शोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्हेल्स लहान मासे आणि प्लँक्टन खातात आणि कधीकधी गटात हल्ले करताना दिसतात. मात्र, मासेमारीच्या जाळ्यात अडकणे, जहाजांशी टक्कर, ध्वनी प्रदूषण आणि आवासाचे अधोगती यासारख्या गंभीर धोक्यांमुळे त्यांच्या संरक्षणाची गरज असून, हम्पबॅक डॉल्फिनपेक्षा कमी प्रमाणात दिसली तरी ब्राइड व्हेल्सची ही निरीक्षणे या क्षेत्राच्या समुद्री जैवविविधतेचे प्रतीक आहेत.

या लेखाच्या पुढील भागात या प्रजाती बद्दल आपण आणखी काही विशेष संशोधन कार्याचा मागोवा घेऊया.
लेखन
प्रदिप नामदेव चोगले
मोबाईल: - 9029145177
pradipnc93@gamil.com
दि ११/0५/२०२५
रेवदंडा , महाराष्ट्र
टीप: - आपली प्रतिक्रिया खाली कमेन्ट मध्ये नक्की नोंदवा. हा लेख आणि माझा प्रयत्न आवडल्यास आपण याची लिंक आपल्या मित्र-परिवार सोबत वितरित करा.
अधिक माहितीसाठी संदर्भ: -
- Saroj, V., Musaliyarakam, N., PR, A., HD, P., Koya, K., PS, A., & Nagpure, R. S. Molecular Studies on Bryde's Whale (Balaenoptera Brydei, Olsen, 1913) and Eden's Whale (Balaenoptera Edeni, Anderson, 1878) Stranded Along the South-West Coast of India Using DNA Barcoding.
- Sutaria, D., Sule, M., Jog, K., Bopardikar, I., Jamalabad, A., & Panicker, D. (2017). Baleen whale records from India. Paper SC/67a/CMP03rev1 presented to the IWC Scientific Committee.
- Jog, K., Sutaria, D., Grech, A., Jones, R., Sule, M., Bopardikar, I., & Marsh, H. (2024). Risks associated with the spatial overlap between humpback dolphins and fisheries in Sindhudurg, Maharashtra, India. Endangered Species Research, 53, 35-47.
- Jefferson, T. A., Webber, M. A., & Pitman, R. L. (2011). Marine mammals of the world: a comprehensive guide to their identification.
Comments
Post a Comment