सागर कथा ५ -  समुद्री जीव आणि त्यांच्या तऱ्हा ( Oyster drill )

आज आपण एका अश्या गोष्टीला समुजून घेणार जी आपण खूप वेळा समुद्र किनार्‍यावर पाहतो अथवा खूप वेळा जेव्हा आपण मासे जाळ्यात पकडतो अथवा कालव किवा शिवल्या / शिंपल्या जातो तेव्हा आपण अनुभवतो. शिंपल्या अथवा आणखी काही खुबे (Oyster / Bivalvia) यांच्या वर आपणास गोलाकार असे काही छिद्र दिसून येतात. आपण जाणून घेऊया आता या मागची गंमत आणि थोडसं समुद्रविज्ञान.

   विज्ञानाच्या भाषेत सांगयचा तर समुद्रात खूप सारे प्राणी राहतात ज्यांना आपण त्यांच्या विशिष्ट गुणधर्म आणि शरीर रचना यांवरून विवीध गटात ठेऊन अभ्यास केला जातो. आज या लेखामध्ये आपण ज्या प्राणी गटाला विशेष ओळख करून घेणार आहोत त्याला मृदूकाया प्राणी वा Mollusca असं म्हणतात. मृदुकाया प्राणी या गटात मोडणारे प्राणी शरीराने मृदु अर्थात नरम असतात. शरीराचे मुख्य भाग हे कठीण अश्या कवचामध्ये असतात पण क्वचित हे कठीण कवच शरीराअंतर्गत असतात. शिंपले, शिवल्या, खुब्या, माकुल, कालवं, गोगलगाय असे आपल्या परीचयाचे काही समुद्री जीव या गटात मोडतात. या प्राणी वर्गात मोडणार्‍या जीव मुख्यता त्यांच्या शरीर वैशीष्टा सह खूप खास आहेत. या मृदुकाया प्राण्यांकडे Radula अर्थात असा एक अवयव असतो ज्याचा साह्याने हे जीव अन्न पदार्थ उदा. शेवाळ वा समुद्री गवत असलेल्या खडकांवर अन्न शोधतो आणि आपली पक्कड बनवून ठेवतो. या मृदुकाया जीवांमध्ये एक वर्ग येतो असे प्राणी जे आपले शरीर दोन समांतर वा भिन्न अश्या कवचानमध्ये राखून असतात. शिंपले, कालव, शिवल्या असे मृदुकाया प्राणी वर्गाला radula नसतो.

   इतर मृदुकाया प्राणी (Mollusca) अपवाद द्विकवच धारी(Bivalvia ) हे आपल्या कडे असलेल्या Radula च्या मदतीने इतर प्राण्यांवर आपलं भक्ष बनवतात किवा हलचाल करताना अथवा खडकानंवर असलेली शैवाल खातात. भिंतीवर जसे आपण ड्रिल मशीनने होल करतो तसेच हे जे radula हे दातेरी असतात.

  आपण जेव्हा शिंपले किवा तीसर्‍या/ शिवल्या आणतो तेव्हा आपल्याला एका कोनत्यातरि बाजूवर एखादा होल दिसतो आणि आतला शिंपला पुर्णपणे रिकामा असतो. या होल करण्याच्या प्रक्रियेला Oyster drills असे म्हणतात.

 या प्रक्रियेला आपण समजून घेण महत्वाचा भाग आहे कारण आज देखील महाराष्ट्रात पुष्कळ ठिकाणी किनारि भागात कोळी महिला आणि इतर मासेमारी बांधव कालव आणि शिंपल्या जमा करून आपलं पोट भरतात. Oyster drills सारख्या नेसर्गिक प्रक्रियेमुळे जेव्हा शिंपल्या आणि कालव पालन या गोष्टींना खूप जास्त आर्थिक नुकसान होतं. यात पुष्कळ वेळा समुद्री गोगलगाय ( marine snails ) इतर bivalve/gastropod( शिंपले / खुबे) यांवर ड्रिल करतात. या प्रक्रियेत सर्वात प्रथम कॅल्शियम ला कमी करणारे अॅसिड टाकले जातात त्या नंतर radula ने होळ केला जातो. काही आधुनिक संशोधकांनी या प्रक्रियेवर आपला वेगली भूमिका मांडली आहे. हि गोष्ट आपण रोज पहातो आणि अनुभवतो म्हणून या मागील बाजू आपणास माहिती असली पाहिजे.  
   मित्रांनो कसा वाटला हा लेख आणि ही माहिती नकीच्च कळवा.

 तुम्हला जर असे काही ड्रिल असलेले प्राणी आढळले तर ती
 माहिती आणि फोटो मला पाठवा. 
      आवडल्यास नक्कीच शेयर करा. आपल्या प्रतिक्रिया कळवा 

                                            एक सागरपुत्र
 प्रदीप ना. चोगले 




                                                   

लेखन - प्रदिप नामदेव चोगले
संकल्पना - प्रदिप चोगले आणि दर्शन कोळी
टंकलेखन - विजय नामदेव चोगले
निर्मिती  - सागराणा creating sustainable oceans resources


 


संदर्भ 
अधिक माहितीसाठी वाचा काही संशोधन पत्रिका आणि लेख: - 


  • Butler, P. A. (1985). Synoptic review of the literature on the southern oyster drill Thais haemastoma floridana.
  • Brown, K. M., & Richardson, T. D. (1988). Foraging ecology of the southern oyster drill Thais haemastoma (Gray): constraints on prey choice. Journal of Experimental Marine Biology and Ecology114(2-3), 123-141.












   






  

Comments

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५