मासेमारी आणि संरक्षित समुद्री मासे Rhynchobatus djiddensis 

गोष्ट आहे एका भटकंतीची ध्येयाणे भाराऊण जेव्हा आपण प्रयत्न करत असतो यश मिळवण्यासाठी तेव्हा आपणास काही अनपेक्षीत अनुभव प्राप्त होतात.असा एक अनुभ जो आपणास विचार करायाला भाग पाडतो.
नववर्षा च्या सुरूवातीलाच एक ध्येय ठरवून मी माझे दैनदिंन जीवन सुरू केल होत.  त्यातील एक ध्येय होत ज्या समाजात मी वाढलो त्या समाजातील आताचे प्रश्न आधुनिक समुद्री  विज्ञानाच्या नजरेतूण पाहणे.  जानेवारी २०१८ चालू होत भल्या पहाटेच घरून भाऊच्या धक्यावर गेलेा. सर्वत्र एकच गोंधळ आणि कल्लोल चालू होता.   माणसे आणि मासे यांच्यात जणू स्पर्धा रंगली होती. चांदेरी मासे सूर्याच्या कोवळया उन्हात चमकत होते आणि त्याच बरोबर चांदेरी रूपेरी दागिने घातलेल्या कोळणी आपल्या उत्साहात बाजार करत होत्या. माणसाच्या या कोलाहलात वाट काढत मी आत शिरत होतो .
कुठेतरी पडून राहलेले पाकट आणि कुठेतरी चालू असलेला मावऱ्याचा लिलाव यांनी जणू वातावरण ढवळूण निघत होते.  तेवढयात माझ्या नजरेसमोर आला असा एक ओलखीचा आकार सोंडाल अर्थात ज्याला रांजा पोक अथवा ज्याला आर. डिजिदसेस असे म्हटले जातो तो मासा .
  वर्णन आणि ओळखः-
  गिटार सारखा आकार असल्यामुळे यांस 'गिटार फिश'  अस देखील सामान्यपणे  म्हटले जाते.  पुढील भागात असलेल्या ( pectroal base ) एक गडद काळा ठिपका वा चटृटा डोळयांच्या मध्ये असलेला काळी किनार आणि वरच्या बाजूला असलेली पाढंराच्या ठिपक्याची एक माळ,  टोकदार असेला पुढच्या तोंडाचा भाग,  काळसर हिरवाा वरच्या बाजूला रंग,  पांढर रंगाच्या खालचा भाग, तोंड लहाण आणि चपट ही साधारण काही ठळक शरीर  शरीरावरची वैशिष्ठे पाहूण आपण हा मासा ओळखू   शकतो.
अधिवासः-
  साधारपणे हा मासा खाडी व समुद्रकिनाऱ्या  लगत आढळुण येतो, जेथे साधारण पाण्याची खोली
  २. ५०  मि इतकी असू शकते.
कायदा अन्वये सुरक्षाः-
  भारत सरकारद्वारे भारतीय जैवविविधता सुरक्षा कायदया अतंर्गत (protection act 1972) या मत्स प्रजातीस  (schedule species I) मध्ये  अंतर्भाव करण्यात आला आहे. या कायद्या च्या  अंतर्गत या मत्स प्रजातीस पकडणे अथवा विकणे वा खाणे यांवर प्रतिबंध  लावण्यात आला  आहे. यात दोषी अढल्यास ७ वर्ष कारावास अथवा २५,००० रुपये दंड आकारण्यात येईल
सवंर्धणात्मक धोरणः- 
  जागतिक निसर्ग संवर्धण संघटनेनुसार (IUCN) या मत्स प्रजातीला vulnerable अर्थात असुरक्षित प्रजातीच्या गटात सामील केल आहे.  जगभरातील ४७२८ प्राणी व ४९१४ वनस्पती प्रजातीस या  संघटनेनुसार vulnerable अर्थात असुरक्षित गटात नोंद केली गेली आहे.  या गटात नोंद असलेल्या प्राण्यांचा अधिवासाचा ऱ्हास होतोय हे या मागील मुख्य कारण आहे. 
  आपण ज्या R. djiddansis बद्दल बोलत आहेत त्याच्या धोक्याच्या पातळीवर जाण्यामागचं   कारण आहे अयोग्य पध्दतीची मासेमारी, संवर्धण धोरणाच्या  अमंलबजावणीचा अभाव आणि बाजरपेठेत मिळणारी अवास्वव किंमत, मासेमारी आणि जैवसंवर्धण दृष्टीकोनाचा अभाव. 
  मित्रांनो हे सर्व वाचून वा ऐकूण तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग का हा मासा का पकडला जातो?  या गोष्ठीच्या मुळापर्यंत जर आपण पोहचलो तर एक गोष्ठ  आपणास  मी निष्चिपणे सांगू षकतो खरचं आपण ज्यानां संवर्धण अथवा चिरंतन विकास म्हणतो त्याच्या संकल्पणेत आणि अमंलबजावणीत  बरीच मोठी दरी आहे. 
संवर्धणाचा पांरपारिक वसा आणि मासेमारी:-
कोळयांचा धंदा ह्या जिवा उधारी पाठीशी उभी आहे एकविरा आई या भावनेतुन ज्यांच्या कष्टाला उभारी मिळते,  भक्तीतुण ज्याला धैर्य मिळते असा हा मासेमारी समाज. आजही पांरपारिक पध्दतीणे मासेमारी करणारा. मासेमारी आणि  निसर्ग चक्राला धक्का नाही पोहचणार म्हणून नारळी पौर्णिमे नंतर मासेमारी करतो. उन्हाळया नंतर येणारे पावसाचे नभ  हे मत्सप्रजनन कालावधी म्हणून मासेमारी तो बंद करतो यांसाठी आपणास त्यांना काही संवर्धणाचे धडे दयावे लागत नाही, पंरतू वाढती महागाई, सरकारी योजनेच्या अंमलबजावणीत घेणारी वाताहात, मत्स विक्री च्याबाबत योग्य धोरणाचा अभाव, पंरप्रातियांची, घुसखोरी, आणि वाढत प्रदुषण यांमुळे या संवर्धनात्मक गोष्टीला खिंडार पडत आहे.  जालं  वल्ही घेऊन रोज हा दर्यावर्दी आता खोल खोल  समुद्रात आर्थिक ध्येय ठेऊन मासेमारी करत आहे. 
  संरक्षित प्रजातीय संवर्धण कस?
     या प्रश्नच  उत्तर आहे अर्थात चिंरतण विकास आणि आर्थिक बाब याच्या समन्वय साधून  असे झाल तरच या मत्स प्रजाती आणि मासेमारी टिकुण राहील. 
मित्रांणो हा लेख काहीसा ललित काहीसा वर्णनात्मक व नंतरमुद्देसूद अश्या संमिश्र  प्रकारात लिहिला आहे. कारण एवढंच कि ही गोष्ट सहजतेण, सुंदरतेण पण वैज्ञानिक बाबी सोबत सर्वांपर्यंत पोहचवणे.    
हा लेख लिहीणार मी या सागराचा बच्चा एक सागरपुत्र . बद्दल निष्चित घडेल पण सोबत हवी तुम्हा सर्वांची


  लेखण - प्रदिप नामदेव चोगले
संकल्पना - प्रदिप चोगले आणि दर्शन कोळी
टंकलेखण - विजय नामदेव चोगले
निर्मिती  - सागराणा creating sustainable oceans resources




pradip n chogale



मित्रांनो  अधिक  माहितीसाठी  वाचा काही  संदर्भ सूची -
http://vindhyabachao.org/wildlife_guidelines/schedule_species_fishes.pdf



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५