दि. ४ मार्च २०१९,
  आज डॉ. आनंदी गोपाळ पहिला. समर्पण, शिक्षण आणि ध्येयवादी विचार याचं त्रिवेणी संगम आज अनुभवला. आणखी काही दिवसांनी आयुष्याचा एक नवीन पर्व सुरु होईल. माहित नाही मला कि समर्पणचा गणित मला जमेल वा नाही परंतु एक मित्र एक सोबती आणि एक छान पती म्हणून होण्याची मी भूमिका जगण्याचा प्रयत्न करेल.
  स्त्री म्हणून माझ्या आयुष्यात बऱ्याच जणी येऊन नेहमी काही तरी मला भरभरून देऊन गेल्या. माझी आई, मावशी, ताई, आत्या, काकी, मामी, वहिनी, मैत्रिणी, प्रियसी आणि त्याच बरोबर काही स्त्रीया आदर्श आणि प्रेरणा घेऊन आल्या आणि स्थिरावल्या.
  प्रेम, कारुण्य, त्याग, समर्पण, मैत्री, मेहनत, सुंदरता, नीटनिटकेपणा याची जाणीव मला त्यांमुळे झाली आणि आता ही होत आहे.
  मी या चित्रपटाद्वारे आज जाणिपूर्वक त्या प्रत्येक 'ती' ला thank you म्हणेल जिच्या मुले माझं आयुष्य समृद्ध झालं.
               
                  - ( प्रदिप ना. चोगले )

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Guardians of the Sea: How the Koli Community’s Wisdom Can Transform Marine Conservation

भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग ४