
जलपरी अथांग महासागराची - सिल्व्हिया अर्ले जवळपास ९०% मासे आणि मत्स जीव जे आपण खाण्यासाठी म्हणून समुद्रातून पकडतो, साधारण ५०% समुद्री प्रवाळ (coral reef ) आणि आणखी बरेच काही सुंदर आणि महत्वपूर्ण अशी सागरी जैवविविधता आजच्या घडीला आपण नष्ट केली आहे. खुप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक समुद्रात आपलं बस्तान पसरवत आहे. खुप काही वाईट आणि पर्यावरणाला हानी पोचवणारी कृत्ये मनुष्य प्राणी राजरोस पणे करत आहे. पण या आव्हानात्मक काळात एक जलपरी गेल्या ४ दशकापासून महासागर अभ्यासत आहे. हि गोष्ट आहे तिची आणि तिच्या समुद्रवेड्या ध्यासाची. हा ध्येय वेडा प्रवास सुरु झालं १९५३ पासून जेव्हा आपला भारत देश नुकताच गुलामीतून मुक्त झाला होता. संपूर्ण जग चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी स्पर्धा करत होते. परंतु ती तेव्हा पहिल्यांदा समुद्रात खोल उडी मारते. महासागराचं अंतरंग न्याहाळले आणि मग सुरु होतो एक ध्येय वेडा प्रवास. ती सतत या समुद्राच्या खोलात जाऊन आपली गट्टी आणखी घट्ट करते. जवळपास ९९% समुद्र आज संपूर्ण रित्या आपणासाठी आज खुला आहे मग आपण त्यात काही करावे म्हणजे आज त्या...