दि १ मे २०१९ महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन


 
समुदाय-आधारित  संवर्धन (Community-based conservation ), टमर (TAMAR - IBAMA) प्रकल्प ब्राझील आणि महाराष्ट्रातील कोळीवाडे - भाग २



उजळणी :-
  मागील लेखामध्ये आपण महाराष्ट्रातील तसेच देशात इतर जी विकास कामे होत आहेत आणि त्यात जी असंख्य कोळीवाडे आणि सागरी अधिवास नष्ट होत आहेत या बद्दल समजून घेतलं. या अश्या वातावरणात आपली समुद्री उपजीविका आणि सागरी अधिवास टिकवण्यासाठी समुदाय आधारित संवर्धनाची गरज समजून घेतली. या लेखामध्ये आपण या पद्धतीचं एक यशस्वी जागतिक उदाहरण समजून घेऊ. जे उत्तम उदाहरण आहे जागतिक पातळीवर फुटबॉल मध्ये आपला नाव सोनेरी अक्षरात कोरणाऱ्या 'ब्राझील' या देशाचं.
प्रस्तावना :-
  जागतिक पातळीवर फार पूर्वीपासून स्थलांतरित जिवासंबंधी फार काटेकोर नियम करून त्याच रक्षण केले जात. ब्राझील मध्ये साल १९६७ पासूनच लेदरबॅक ( Dermochelys coriacea ) आणि हॅक्सबिल ( Eretmochelys imbricata  ) या सागरी कासवांना पकडण्यावर बंदी होती. या सागरी जीवांच्या रक्षणासाठी हि बंदी साल १९७९ पर्यंत आणि काही प्राण्याचं अंतर्भाव करून वाढवण्यात आली. यात १९७९ पर्यंत ऑलिव्ह रिडले( Lepidochelys olivacea ) , लॉंगर हेड ( caretta caretta ) आणि हिरवी कासव ( Chelonia mydas ) या तीन प्रजातीचा अंतर्भाव करण्यात आला.
विषय गाभा:-
  जागतिक पातळीवर पर्यावरण आणि समुद्री अधिवास यांची जोरदार चर्चा होत होती. वाढत जाणारी सागरी कासवांची तस्करी, चुकून होणारी मासेमारी आणि सागरी किनाऱ्यावरील अधिवास नष्ट होण्याच्या धोका. या सर्व गोष्टीमुळे ब्राझील सरकारला काही कठोर पाउले उचलण्याची गरज भासू लागली. समुद्र पर्यटन आणि क्रीडा या दोन गोष्टी ब्राझील ला आर्थिक रित्या समृद्ध करत होत्या. पण पर्यावरणीय समस्या आणि त्यासाठी जगात विचारला जाणारा जाब यांमुळे एक पाऊल पडलं. यातून निर्माण झाला National Marine Turtle Conservation Program ( Project TAMAR ) साल १९८० मध्ये. या टमर प्रकल्पात आणखी एक संस्थ्या सामील झाली ती म्हणजे IBAMA.
   समुद्री कासवे हि आपल्या जीवनकाळात खुप मोठया प्रदेशापर्यंत स्थलांतरित करतात. यातील प्रत्येक प्रजाती विशिष्ट असा अधिवास पसंत करते.  जीवनाच्या एक काळावधी हि समुद्री कासवे खुप मोठया अश्या समुद्री प्रवास करतात आणि प्रजनन करण्यसाठी खास अश्या समुद्र किनारी अंडी देण्यासाठी येतात. १९६७ पासून ब्राझील मध्ये सुरु झालेली ही कासव संवर्धनाची भूमिका टमर प्रकल्पामुळे आणखी जोरकस पणे मजबूत झाली. सुरुवातीपासून ज्या ठिकाणी हि कासवे आपली अंडी घालत होती ती जागा स्थानिक पर्यटन आणि मासेमारी यांमुळे अडचणीत आल्या होत्या. त्याच बरोबर मासेमारी करत असताना मुख्य असं  मासे पकडताना सोबतच कासव पण नकळत पणे जाळ्यात अडकली जात होती. कासव पकडण्यावर बंदी आणि दंड असल्या कारणाने जर चुकून कासव जाळ्यात अडकली गेली तर ती लगेच स्थानिक मासेमारी करणारे ती कासव काढून समुद्रात सोडत असत. परंतु या प्रयत्नामध्ये एक समस्या होती ती म्हणजे जेव्हा हि कासव जाळ्यात अचानक अडकली जात त्या वेळी ती भीती आणि पाण्याच अभाव यामुळे काहीशी गुदमरल्यासारखी होत आणि असेच जर एखादा कासव लगेच समुद्रात त्याच अवस्थेत सममुद्रात टाकला गेला तर त्याच जीव वाचण्याच्या ऐवजी ती मृत पावत.
  साधारणपणे ११०० किमी लांबी असलेला समुद्र किनारा या टमर प्रकल्पा अंतर्गत संवर्धनाच्या आवाक्यात होता. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात मुख्य उद्देश होता एकूण कासव किती, अधिवासातील विविधता , कासाव प्रवासाचं एकूण किती अंतर कापुन या किनाऱ्यावर कधी येतात, प्रजनन आणि अंडी देण्याचा कालावधी किती इत्यादी.  सुरुवातीला काळात यात तितकंसं यश नाही मिळालं परंतु मासेमारी समाजाचं योगदान जेव्हापासून या गोष्टीला लाभलं तेव्हा पासून या प्रकल्पाने कधी मागे वळून नाही पाहिलं. जो समाज फार पूर्वी येथे मासेमारी करत होता आज तो समाज या येथे मत्स संवर्धन म्हणून नेतृत्व करत उभा आहे. यामुळेच आज या प्रकल्पा मधील ८५% लोक हि स्थानिक मच्छिमार आहेत.
  या प्रकल्पा अंतर्गत हा सागरी किनारा दोन मुख्य अश्या भागात विभागला गेला एक अर्थात (nesting area)  अंडी देणारा विभाग आणि दुसरा म्हणजे (feeding area) चराई वा अन्न पुरवठा विभाग. समुद्री कासव हि या विशिष्ट अश्या विभागात ऋतुमानानुसार आपली उपस्थिती दर्शवत. यांतील nesting area  ला ISA आणि CA या दोन उपविभागात विभागले गेले. साधारण प्रत्येकी १ मच्छिमार सुमारे ५ किमी समुद्र भाग स्वतः चालून वा बोटीने नजरे खालून रोज घालवतो आणि स्वतःची उपजीविका सांभाळत समुद्र संवर्धन करतो. Feeding area म्हणजे असं विभाग जेथे हि समुद्री कासव समुद्रात अन्न च्या शोधात असतात अश्या वेळी मासेमारी बांधव जाणीवपूर्वक समुद्री कासव रक्षित होईल अशी मासेमारी करतो. त्याच बरोबर याला पर्याय म्हणून कालवे(ऑईस्टर) आणि शिंपले याची शेती हे पर्यायी उपजीविकेची साधन म्हणून वापरतात. साल १९९९ पर्यंत या प्रकल्पामुळे ११०० किमी समुद्र किनारपट्टीवर २१ टमर संवर्धन केंद्रे उभी राहिली आहेत. ज्यात ८५% रोजगार हा स्थानिक मासेमारी समाजाला मिळाला आहे. या प्रकल्पा अंतर्गत आज तेथील पदवी आणि पदवीपूर्व शिक्षण घेणारी विदयार्थी या प्रकल्पात ६ महिने काम करून आपलं पुस्तका बरोबरच जीवनातील खरं असं जीवशास्त्र आणि व्यवस्थापन शिकतात.  असं आहे हा टमर प्रकल्प ज्यात मासेमारी समाजाला स्वीकारून मोठं यश गाठता आलं.
           
                 लेखन- प्रदिप नामदेव चोगले

टीप- समुदाय आधारित समुद्र संवर्धन आपणास समजावं आणि आपला भारतीय मासेमारी समजा देखील असं भूमिका घेऊंन आपला समुद्र खाडी किनारा व मासेमारी करत समुद्र सवर्धनाकडे वळावा. आपल्या मुबंई आणि इतर देशात मासेमारी आणि हा समाज किती गरजेचं आहे ही हि भूमिका विकासकाने समजून घेऊनच विकास करावा.
  आपणांस हा लेख कसा वाटला आपली प्रतिक्रिया देऊन दर्शवावी. आवडल्यास आपल्या मासेमारी समाजात आणि इतर नागरिकांपर्यंत पोहचवावा.

अधिक  माहितीसाठी वाचा :-
  • Marcovaldi, M. Â., & Dei Marcovaldi, G. G. (1999). Marine turtles of Brazil: the history and structure of Projeto TAMAR-IBAMA. Biological conservation91(1), 35-41.
  •  Marcovaldi, M. A., Baptistotte, C., De Castilhos, J. C., Gallo, B. M. G., Lima, E. H. S. M., Sanches, T. M., & Vieitas, C. F. (1998). Activities by Project TAMAR in Brazilian sea turtle feeding grounds. Marine Turtle Newsletter80(5-7).
  • खाली दिलेली चित्रे . 
  •  https://in.pinterest.com/pin/57561701472333636
  • https://www.aqua.org








Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५