जलपरी अथांग महासागराची -  सिल्व्हिया अर्ले



  जवळपास ९०% मासे आणि मत्स जीव जे आपण खाण्यासाठी म्हणून समुद्रातून पकडतो, साधारण ५०% समुद्री प्रवाळ (coral reef ) आणि आणखी बरेच काही सुंदर आणि महत्वपूर्ण अशी सागरी जैवविविधता आजच्या घडीला आपण नष्ट केली आहे. खुप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक समुद्रात आपलं बस्तान पसरवत आहे. खुप काही वाईट आणि पर्यावरणाला हानी पोचवणारी कृत्ये मनुष्य प्राणी राजरोस पणे करत आहे. पण या आव्हानात्मक काळात एक जलपरी गेल्या ४ दशकापासून महासागर अभ्यासत आहे. हि गोष्ट आहे तिची आणि तिच्या समुद्रवेड्या ध्यासाची.
    हा ध्येय वेडा प्रवास सुरु झालं १९५३ पासून जेव्हा आपला भारत देश नुकताच गुलामीतून मुक्त झाला होता. संपूर्ण जग चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी स्पर्धा करत होते. परंतु ती तेव्हा  पहिल्यांदा समुद्रात खोल उडी मारते.  महासागराचं अंतरंग न्याहाळले आणि मग सुरु होतो एक ध्येय वेडा प्रवास. ती सतत या समुद्राच्या खोलात जाऊन आपली गट्टी आणखी घट्ट करते. जवळपास ९९% समुद्र आज संपूर्ण रित्या आपणासाठी आज खुला आहे मग आपण त्यात काही करावे म्हणजे आज त्यात कोणी प्लॅस्टिक कचरा टाकतो, समुद्री खनिज जमा करावी, कोणी मासेमारी करावी तर कोणी फक्त त्याच्या ओल्या वाळूत लोळून मजा घ्यावी ; निवडीचं अधिकार ज्याला त्याला. ती तिचा निर्णय घेते आणि ठरवते कि हा महासागर आणखी समजून घ्याचा आणि तो सर्वाना समजून सांगायचा. या प्रयत्नातून सुरु होते एक समुद्र अविष्काराची यात्रा आणि जन्म होतो " डीप सर्च " या संस्थेची जी सागराची अथांग खोलीत अज्ञात अश्या सागरी अधिवासाच्या संशोधनाची सुरवात करते. या प्रवासात उलगडत जातात काही अद्भुत सागरी जीव आणि त्याच्या तऱ्हा. समजून घेता आला आपला आणि या महासागरचं सबंध.
   अगदी तिच्याच शब्दात सांगायच तर आज आपण या सागराची आणि सागरी अधिवासाची खूप हानी केली आहे. आज मोठ्या मोठ्या उपहारगृहात समुद्री मासे जी मुख्यतः अन्नसाखळीत सर्वात वर आहेत उदाहरणार्थ कुपा (tuna ) सारखे आपलं आवडत खाद्य आहे आणि याच परिणाम असा झालं की मोठ्या प्रमाणात आपण सागरी जीवसृष्टीचं समतोल ढासळला आहे. वातावरणात वाढत जाणार कर्बन डायऑक्सईट आणि इतर विषारी वायू यांमुळे समुद्राचं पाणी अधिक आमलयुक्त (Ocean acidification )  होत आहे यांमुळे सर्वात अधिक हानी होत आहे ती म्हणजे समुद्री प्रवाळ आणि इतर कवच धारी मृदुकाय प्राणी ( coral and Marine molluscs )  याची रक्षण करणारी कॅल्शियम युक्त कवचाची जाडी कमी होत आहे आणि ते आणखी ठिसूळ होत आहेत.  समुद्री प्रवाळ हि पृथ्वीवरील सर्वात उपयुक्त आणि जैवविविधतेने नटलेली अधिवास आहेत, सागरी प्रवाळ आज जवळपास ५०% हुन अधिक नष्ट झाली आहेत. वाढत जाणार तापमान यांमुळे आर्टिक आणि  अंटाटिक ध्रुवावरील हिमनग आणि बर्फ वितळत आहेत आणि याचा परिणाम होत आहे ध्रुवीय अस्वल आणि पेंग्विन याचा अधिवास नष्ट होत आहे. वाढत जाणारी आधुनिक पद्धतीची मासेमारी आणि ट्रालार व आधुनिक मासेमारी नौका यामुळे समुद्र अगदी खरडवून काढला जातोय. आज आपण जागतिक मासेमारी आणि ऐकून मत्ससाठे यांची आकडेवारी पाहिली तर समजून येईल आपण मोठ्या प्रमाणात सागरी मासे नष्ट करत आहोत. जर याच सर्वात मोठा परिणाम आपणांस समजून घ्याच असेल तर आपण कळेल कि आपले वाडवडील आणि आज आपण करत असलेली मासेमारी यांमध्ये समुद्री मासे आणि त्यांचा आकार यांच्यात कमी येत आहेत, तसेच काही मासे जी फार पूर्वी अगदी खाडीकिनारी सापडायचे ते आता एकतर कमी झाले आहेत वा त्याना पकडण्यासाठी आता आपणांस आणखी खोल समुद्रात जावं लागतं. Longline सारख्या मासेमारी प्रकारामुळे आज समुद्रात मोठ्या प्रमाणात नाहक अश्या सागरी जीवाचं बळी जात आहे.
   टेड २००९ चं विजयी पारितोषिक स्वीकारताना सिल्व्हिया अत्यंत भावपूर्ण शब्दात अखंड जगाला हाच संदेश देऊ इच्छिते कि जेथे पाणी आहे तेथे जीवन आहे , जर समुद्र असेल तरच या धरतीवरील जीवन असेल. आपणास जर आपल्या पुढील पिढीला जर या महासागरी संपत्तीचा वारसा द्याचा असेल तर आजचं योग्य वेळ आहे. काय करू शकतो आपण हि समुद्राची बिकट अवस्था चांगली करण्यासाठी तर ते म्हणजे एक सकारात्मक विचार समुद्र संवर्धनाचा. छोट्या छोट्या गोष्टी जसं कि प्लॅस्टिक चा कमी वावर आणि प्लॅस्टिक कचऱ्याचा योग्य नियोजन, पारंपरिक चिरंतन मासेमारी, आणि सागरी मासे व सागरी अधिवास यांबद्दल अधिका अधिक लोकांना समजावणे.
   समुद्रात असणाऱ्या सूक्ष्म प्लवक (plankton) सारख्ये जीव आणि समुद्री वनस्पती यांमुळे आज जो प्राणवायू आपणस मिळतो त्यामुळे आपण आज जिवंत आहोत. कारण आपण आज जो प्राणवायू घेत आहोत तो या समुद्रामुळेच आपणांस मिळतो. त्यामुळे फरक पडत नाही की समुद्र किनारी राहतो कि कोठे दूर दऱ्या खोऱ्यात आपण नेहमीच समुद्राशी जोडले असतो.
   समुद्र विज्ञान शाखेचा एक विदयार्थी आणि आता एक समुद्र संशोधक म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना आपला जीवन ज्या स्त्रीने या महासागराठी समर्पित केलं तिच्या कार्याची  तोंडओळख माझ्या मासेमारी समाजपर्यंत पोहचवणे म्हणून हा लेख लिहिण्याची प्रेरणा मला झाली. या जलपरी चं कार्य आपणस आणखी समजून घ्याच असेल तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन खालील व्हिडिओ नक्की 
पहा . 
   समुद्रावर प्रत्येकाचं नातं या लेखा  मुळे जर मजबूत झालं तर हा लेख लिहिण्याचं साफल्य होईल. आपली प्रतिक्रिया द्द्यायला  विसरू नका.

  एक सागरपुत्र-
         प्रदिप नामदेव चोगले

Comments

  1. Your article is really good sir it protray's your knowledge, awareness and love for marine life ....👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५