अनुभूती अद्भुत सृजनाची - कैलास मंदिर आणि औरंगाबाद

  काही गोष्टी अश्या असतात ज्या बद्दल आपण कितीही बोललो तरी अनुभवाशिवाय ती गोष्टी कशी हि समजू शकतच नाही. असा एक अनुभव 'याची देही याची डोळा' वेरूळ ची जैन लेणी आणि कैलास मंदिर पाहणे. खूप वेळा काही गोष्टी आपण न ठरवता अनुभवतो तसाच हा प्रवास अनुभव. साधारण वर्षभर काम केल्याचा क्षीण कमी करण्यासाठी आणि मैत्रीची गोडी वाढवणायासाठी केलेला सुंदर प्रवास.
  शुक्रवारी कामाचे तास संपून रात्रीच जेवण उरकल्यावर आम्ही सर्व दोस्त एक खाजगी गाडी करून औरंगाबाद साठी मार्गस्थ झालो.  आठ तास लागतील असा अंदाज होता परंतु मुबंई पासून सुरु झालेला पाऊस आणि खराब रस्ता या कारणाने हा प्रवास १२ तास खर्च करून पूर्ण केला. सकाळची पोटपुजा करून तडक दौलताबाद चा किल्ला गाठला. १२ व्या शतकात बांधलेला हा एक अजस्त्र किल्ला यादव राजवटीची याद ताजी करतो. यादव राजवटीतील भिल्लमा-२ पासून सुरु झालेला प्रवास १५ व्या शतकापर्यंत विजापूरच्या आदिलशाही पर्यंत पोहचतो. पुढे १७ शतक उजडेपर्यंत मुघल बादशहा  औरंगजेब चे वास्तव देखील अनुभवणारी हि वास्तू. १९५१ मध्ये या ऐतिहासिक वास्तू ला
राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला जातो. साधारण ७ वर्षांपूर्वी साल २०१३ मध्ये आणखी एक गोष्ट याच्या सन्माना मध्ये भर घालते ती म्हणजे महाराष्ट्रातील सात आश्चर्य म्हणून याचा त्यात सहभाग होतो.
  या वस्तूचा इतिहास सांगणारे बरेच दस्तावेज आहेत परंतु त्याची भव्यता हि त्याला अनुभवून समजू शकतो. भव्य, सुंदर, रेखीव आणि अद्भुत या शब्दांना इथे आल्यावर अर्थ गवसतो. इतिहासाचा अभ्यास म्हणजे भूतकाळा ची सफर ती सफर अनुभव करणे म्हणजे अश्या स्थळांना भेटी देणे. आपले पूर्वज आणि देशवासी आपल्या साठी प्रचंड मोठा वारसा यातून देऊन गेलेत असं जाणवलं आणि डोळे थोडे पाणीदार झाले. एक वाक्य तिथे गेल्यावर आठवलं' ज्यांना आपला इतिहास माहित नाही त्यांचा इतिहास लवकरच होतो' अस ते परंतु खरचं अशी वास्तू पाहिली आणि मन भरून आलं.
 हि सफर अनुभली आणि पुढे आम्ही मार्गस्थ झालो वेरूळ ची लेणी पाहायला. खूप काही लहानपनांपासून या बद्दल ऐकलं होतं काही वाचलं होतं परंतु एक गोष्ट जी अनुभवली ती अद्भुत अशीच. वेरूळची जैन लेणी म्हणजे सुंदरतेची अप्रतिम नजराणा. पण एक गोष्ट जी याला खास करते ती म्हणजे अंतरीची व्याकुळता. भगवान महावीर  यांन बद्दल मला तसा खास काही ज्ञात नाही परंतु ओशो च्या महावीर वाणी नावाचं ध्वनीमुद्रिता एकूण मी त्याच्या प्रेमात पडलो होतो. आज २१ व्या युगात आपण थ्रीडी प्रिंटींग ई. करतो परंतु वस्तू ची विक्रमी निर्मिती आणि विक्री करण्याच्या नादात आपण त्यात सुंदरता ओतन्याचं विसरून गेलो आहोत. काळ्या कातळाला चिरून प्रचंड कष्ट आणि संयम बाळगून निर्मिती करण्याचा अद्भुत सामर्थ त्या कलाकार मंडळी कडे होत. अज्ञाताचा शोध कोणी मंदिरात घेतो तर कोणी स्वतःच्या आता डोकावून ध्यान साधना करून, मार्ग जरी वेगळे तरी अनुभूती एकच. आपण सुंदर आणि श्रेष्ठ गोष्टीच चिंतन करू लागलो तर आपल्या प्रत्येक कृती मध्ये त्याची झलक प्रतिबिंबित होते तसंच काहीसं या लेणी कोरणाऱ्या मंडळी मध्ये झालं असं मला वाटते. ज्याची रचना कळसापासून पायापर्यंत अशी झाली अशी गोष्ट आहे त्याची भव्यता देखील तशीच आणि सुंदरता हि प्रचंड. प्रत्येक पायरी प्रत्येक खांब, प्रत्येक कोपरा प्रत्येक शिल्प प्रचंड जीव ओतून निर्मित केलेलं. आज आपण जीवन जगतो एखाद्या यंत्राप्रमाणे परंतु जीवनातील प्रत्येक क्षण ज्यनि साजरा केला अशी माणसं या जगात होऊन गेली याची प्रचिती या मंदिराच्या रचनेत दिसून येते. भारतीय तत्वज्ञानी आणि प्रयोगशील विचारशील व्यक्ती पु. पांडुरंग शास्त्री आठवले यांनी त्याच्या पुस्तकात ' संस्कृती पूजन' मध्ये मंदिराची संकल्पां खूप सुंदर समजवली आहे. मंदिर म्हणजे जेथे हिंदूंची मूर्तिपूजा मशिदीची भव्यता आणि चर्च ची शांती आपण अनुभवू शकतो ती जागा. या सर्व गोष्टी या मंदिरात आपण पाहू शकतो.
  तंत्रज्ञान आज कितीही पुढे गेल असलं आपण कितीही वेगानं टोलेजंग इमारती बांधू शकतो परंतु अशी रचना आणि त्याची कल्पना अद्भुत अशीच आहे. विज्ञान शाखेचा विदयार्थी म्हणून मला एक गोष्ट फार पूर्वीपासून जाणवते ती अर्थात अशी, माणूस जितक्या वेगानं ज्ञान मिळवत जातो तितक्या वेगानं आपण किती अज्ञानी आहोत याची जाणीव होऊ लागते अहंकार गळून पडतो आणि आपलं मन अज्ञाताच्या शोधात फिरू लागत. ज्ञान वाढलं कि कला समजून घेणं आणि जीवनातील प्रत्येक क्षण साजरा करण्याची पात्रत अंगी येते. कैलास मंदिरा चा मोठा इतिहास आहे परंतु ही वास्तू जेव्हा आपण आपल्या मनानं पाहू लागतो तेव्हा जे आपल्या आत झिरपत ते चिरंतन आणि आयुष्याला पुरेल असं असत. भिंती वरती चितारलेली शिल्प आणि चित्र त्यात वापरलेलं रंग सर्वच प्रचंड मोठ्या दर्जाचे आणि ज्याची नकल करू शकत नाही अशी.
  कैलास मंदिर पाहून दुसऱ्या दिवशी जरी मरण आलं तरी जीवन सार्थकी झालं असच मला वाटलं. रात्री हा सोहळा पाहून जेव्हा मी डोळे बंद केले तरी सर्वच गोष्टी तितक्याच स्पष्ट दिसत होत्या. आज हा लेख लिहिताना या अनुभवला साधारण  महिना उलटून गेला परंतु असं वाटत कि हि अगदी आज पाहिलेली गोष्ट.


       लेखन - प्रदिप नामदेव चोगले
                pradipnc93@gmail.com

संदर्भ :-
-Gopal, Madan (1990). K.S. Gautam (ed.). India through the ages. Publication Division, Ministry of Information and Broadcasting, Government of India. p. 174. ASIN B003DXXMC4

- संस्कृती पूजन, पांडुरंग शास्त्री आठवले



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५