चक्रम 


वर्ष संपल, वर्ष चालू झालं
  जाणीव झाली परीक्षा पुन्हा आली
रात्री नंतर दिवस येतो
  दिवसांतर रात्र येते    II १ II

दिन रात्रीच्या चक्रात आयुष्याची
  पुन्हा एक पहाट होते
माणूस म्हणून जगण्यासाठी
  सैताना बरोबर हार होते  II२II 


करामध्ये जोर नाही आणि
  उरामध्ये धीर नाही
आयुष्याच्या या नव्या खेळीमध्ये
 ना नवा उत्साह, ना नवा श्वास नाही  II३II 


पैलतीरि उभा हा पाडुरंग
 त्याला आता वारकऱ्याची साथ नाही
आजकाल तर सारे नवरात्रीत असतात
  आयुष्याच्या पेटलेल्या वणव्यात असतात  II४II 


कसं आहे म्हटल्यावर बरं असं उत्तर आहे
  खरं नाही परंतु बोलण्याची ही तऱ्हा आहे
माणूस म्हणून जगणे म्हणजे आता ब्रँडवॉर आहे 
  आयुष्यात आता पैरो के लिए पेरॉगोन आहे  II५II 


आहे-आहे आणि नाही-नाही
 या कवितेचा हा फॉर्म आहे 
आयुष्य या पेक्षा काही वेगळं नाही 
  आता सारे आहे आणि उद्या काही नाही आहे 
करून घे मित्रा उल्हास आणि आनंद 
  कारण बापा नंतर पोरा तुझा पहिला नंबर आहे  II६II


कवी:- प्रदिप नामदेव चोगले 
      pradipnc93@gmail.com
      
----------------------------------------------------------------------------

  दि १ ऑक्टोबर २०१३ दुपारी १२.५३ ला मी ही कविता लिहिली. तेव्हा हि कविता मला माझ्या महाविद्यालयाच्या वाचनालयात सुचली होती. जीवन जगताना त्यातील क्षण भंगुरता हा गुण आपण विसरून जातो. आज दि १२ मे २०२० साधारण ४९ दिवस झाले आहेत आणि सारं जग 'कोरोना' नामक विषाणूमुळे त्रस्त झालं आहे. आपण कधीच कल्पना नाही केली की असं देखील होऊ शकत पण आज हे सत्य आहे कि आपण सारे घरी आहोत. पैसा, ब्रॅण्ड, फास्टफूड, दारू, या सर्व गोष्टी आता अर्थहीन ठरल्या आहेत. सध्या एकच गोष्ट महत्वाची आहे ती म्हणे आपला जीव वाचला पहिजे आणि आपण ज्यांना आपलं म्हणतो त्यांचा जीव वाचला पाहिजे.
  जीवनातील अडचणी आणि वाद विसरून आपण जीवनाचा आनंद लुटला पाहिजे असच मला आज या कवितेच्या माध्यमातून सर्वांना सांगायचं आहे. खूप सारे दिवस आपल्या कडे आहेत अशा पद्धतीने जर आपण जगलो तर फक्त ते जगतो जे जगाला आपल्याकडून हवं असत, परंतु खरं रहस्य हेच आहे कि जीवन आज आहे याच पद्धतीने जगलं पाहिजे. समाजात मला जे सध्या दिसत आहे ते मी इथे मांडले आहे आणि यातून मला जे योग्य वाटलं त्याचा मार्ग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या कवितेतून केला आहे. 
  आपणांस ही कविता कशी वाटली ते खाली कमेंट मध्ये जरूर लिहा. हीच कविता माझ्या आवाजात मी माझ्या यूट्यूब च्या चॅनल वर पण टाकली आहे. याची लिंक खाली दिली आहे त्यावर क्लिक करून आपण ही कविता ऐकू शकता. धन्यवाद. 

***************************************************_______________________________________________***************************************************

हि कविता माझ्या आवाजात ऐकण्यासाठी खाली क्लीक करा:- 

https://youtu.be/6rSm_RBBTtQ










Comments

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५