https://youtu.be/DSJCRfsHlws





आणि अचानक


कधी ओलावा अंतरीचा शाल त्याला स्मितहास्याची
  कधी उदास बेभान वारा जाणीव त्याला बोचऱ्या एकटेपणाची    II१II

कधी पवित्र, पुण्य आणि पावन जशी भूपाळी वासुदेवाची
कधी सुरेल पण कारुण्य आणि उद्ववगणीत सिद्धार्थ गौतमाची    II२II

केव्हातरी अचानक अलगद आता मला भास होतात
  जागेपणातही आता स्वप्नाच्या गावी जातात    II३II

जिंकायची वा हरण्याची आशा कधी मणी न होती
  खेळण्याची प्रवृत्ती मात्र अविरत श्वासात होती   II४II

काही गोष्टी सुरु होतात शेवट करून घेण्यासाठी
  कधीतरी मात्र शेवट ठरतो गोड सुरवात करण्यासाठी   II५II

मी काही आता अजून पुरा संपलो नाही
  गाण्यासाठी मात्र हे गीत आता स्वतःचाही  उरलो नाही   II६II



कवी :- प्रदिप नामदेव चोगले 
           pradipnc93@gmail.com


------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



    दि २०/१२/२०१४ मध्ये मी या कवीतेची रचना केली होती. मुंबई मध्ये स्थित विज्ञान संस्था इथे शिकत असताना जेव्हा मी प्राणिशास्त्र आणि समुद्रविज्ञान अभ्यासत होतो तेव्हा अचानक काही तरी मला जाणवलं ते मी या कवीतेतून व्यक्त केल आहे. कथा कवीत आणि आपल्या देशात जन्मलेले महापुरुष आपणास प्रेरणा देतात. सध्या आपल्या देशात आणि जगतात जी कोरोणा ची महामारी त्रस्त करत आहे अश्या वेळी आपण सर्व सहजतेने आणि सोबतीने या गोष्टीवर मात करू ही प्रेरणा आपण घेऊ.





टीप :- आपण ही कवीत माझ्या आवाजात ऐकू शकता माझ्या यूट्यूब चॅनल वर ज्याची लिंक मी खाली देत आहे. आपणांस हि कवीता कशी वाटली याची प्रतिक्रिया आपण खाली कमेंट मध्ये नोंदवावी


https://youtu.be/DSJCRfsHlws


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५