
गणपती बाप्पा - एक सांस्कृतिक प्रतीक निसर्ग संवर्धकाचं आज दिनांक २२/०८/२०२० अर्थात भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच आपली लाडकी श्रीगणेश चतुर्थी. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून जे कोरोना रुपी संकट उभ्या जगतावर चालून आले आहे त्या दुःखा पासून जणू आपणांस हे दुःखहर्ता हे नामाभिमान पूर्ण करण्यासाठी बाप्पा आपल्या घरी आला आहे. आपण कितीही निसर्गावर मात करू अशी भाषा बोलली आणि प्रगती केली तरी आज आपणांस कळून चुकलं आहे कि निसर्ग हाच खरा गुरु आहे. एक छोटासा, डोळ्यांनी हि न दिसणारा विषाणू उभी मानव जातीची गती बंद करू शकतो यावरून आपण या निसर्गा समोर किती खुजे आहोत हे आपणांस समजून चुकले आहे. आपण समुद्राला मागे सारून त्यात मुबंई आणि यांसारखी कित्येक महानगरे उभारली, जंगल आणि डोंगर पोखरून महामार्ग आणि स्मार्ट सिटी वसवल्यात. नदीवर मोठाले धरण बांधून कित्येक गाव आणि जैवविविधता संपन्न अधिवास नष्ट केले. निसर्ग हे सर्व निमूटपणे कित्येक शतके सहन करत होता. पण २०१० पासून तो आपली भूमिका मांडायला लागला. निसर्ग आपली मत व्यक्त करतो तेव्हा आपण हवालदिल हो...