राम भूत्वा राम यजेत







प्रभू रामचंद्र हे माझ्यासाठी आणि बहुसंख्य भारतीयांसाठी सगुण साकार रूपात अवतरलेले ईश्वरी अवतार आहेत. इतर काही जणांसाठी ते आदर्श मनुष्य आहेत तर कोणासाठी रामप्रभू हे विविध मत आणि विचार धारणेसाठी अभ्यासन्याण्याजोगी  गूढ असा विषय आहे. एक मात्र खरं आहे कि बहुसंख्य भारतवासियांसाठी ते एक प्रेरणा आहेत. ज्यांच्या जीवनचरीत्राच्या प्रतिबिबं स्वरूपात आपण 'रामायण' हे महाकाव्य ऐकतो, पाहतो, वाचतो अशी अदभूत चरित्र मुर्ती म्हणजे श्री राम प्रभू. 
  आजचा दिवस हा माझ्यासाठी आणि त्या प्रत्येक भारतीयांसाठी   महत्वपूर्ण आहे कारण हजारो वर्षांपासून सर्वांच्या मनात वसलेल्या  प्रभू रामचंद्राचं मंदिराची आज पायाभरणीची पहिली वीट रचली जाते. 
  'कृष्ण भूत्वा कृष्ण यजेत शिवम भूत्वा शिवम यजेत राम भूत्वा राम यजेत ' या नियमानुसार आपण ज्या गोष्टीच ध्यान करतो तसे होऊन जातो म्हणून आपण आज या शुभ दिनी राम चरित्राचा स्मरण करूया आणि आपल्या जीवनाला राममय बनवूया. 
 श्री राम मंदिर भूमीपूजणाच्या सर्वाना खूप साऱ्या शुभेच्छा.



                               
                                 - लेखन
                           प्रदिप नामदेव चोगले   







image from :- 
https://www.pinterest.ca/pin/388154061633973997/    
  


Comments

Popular posts from this blog

Guardians of the Sea: How the Koli Community’s Wisdom Can Transform Marine Conservation

भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग ४