India _ way toward diversity - मला उमजलेला भारत आणि केरळ

 





रंग त्यांचे वेगळे, वेगळी त्यांची भाषा 

  भाव वेगळे सुर वेगळे , वेगळी त्यांची ऋचा 

भारत भूमी असे आपली आगळी तिची कथा 

  विविधतेत मला सापडली तिची मंत्रमुग्ध करणारी व्यथा  II १ II


नाही मला अवगत येथील मल्याळम भाषा 

   तरी घुमते  आजही येथे तुकाराम आणि मुक्ताई गाथा 

सुर आणि संगीत हे तर जातात ओलांडून सीमाप्रांत व  भाषा 

   एकच नाद एकच साद सांगे 'फक्त प्रभू मी तुझ्या'  II २  II


विज्ञान, साहित्य, कला आणि कल्पकता येथे चहू रंगी नाचते 

    दारा समोर बाग आणि घरी डार्विन-न्यूटन चालते 

शिक्षण देई व्यापक डोळा त्याची नांदी येथे घुमते 

    स्त्री साक्षरता येथे विविध कार्यक्षेत्रात बरोबरीने चालते   II ३  II


जेव्हा ओलांडतो आपण सीमा आपल्या घरं आणि दाराच्या 

 तेव्हा जाणीव तीव्र होते भारत सारा प्यारा था 

एक देश एक ध्वज एक गान खूप खास आहे 

  विविधतेतली एकता हाच आपल्या राष्ट्रप्रेमाचा श्वास आहे    II ४  II


   - प्रदिप नामदेव चोगले 

केरळ (एर्नांकुलम) , ६८२ ०१८ 

१४-०१-२०२१ 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दि ११ जुलॆ २०२० पासुन आज आज दि १४ जानेवारी २०२१ पर्यंत मी अनुभवलेला केरळ तुम्हा सर्व वाचक मंडळी समोर या कवितेच्या माध्यमातून मी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. आज मकर संक्रात वाढत जाणाऱ्या सूर्याच्या तेजाप्रमाणे आपण सर्वानी देखील जीवनात नवीन भाषा नवीन प्रांत यात प्रवेश करावा. 



 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५