डॉल्फिन आणि कविता - १




किनाऱ्यावर आलेत डॉल्फिन


ते उधळत असतात दर्या सागराच्या निळ्या लाटांवर

कधी हळुवार, कधी वेगाने आणि कधी मस्तीने II१II 


सोबत करतात त्या हींमतवाण मच्छीमाराची

आणि दोस्ती करतात काही समुद्री पक्ष्यांची II२II


हुशार असतात ते भारी असे विज्ञान म्हणते

परंतु हुशार माणसांची लबाडी नाही कळतं त्यांना II३II


म्हणूनच ते अडकून पडतात कधी जाळ्यामध्ये

कधी मात्र ते शेवटचा श्वास घेतात ओल्या वाळूमध्ये II४II


अजस्त्र कार्गो जहाजे त्यांची बहुधा फिकीर नाही करत

म्हणूनच होते त्यांची टक्कर महासागरांवर II५II


वाढणारे प्रदूषण, प्लसटीक, तेल गळती आणि लष्करी सराव

माफक प्रमाणात गुन्हेगार आहेत त्यांना संपवण्यासाठी II६II


मी एक बालक लहान काय करू त्यांचासाठी

संशोधन, संवर्धन करेल त्यांच्या कुतुहलपोटी II७II


- कवी 

प्रदिप नामदेव चोगले 

१०.१२.२०२१ 

०१.५६ दुपार / केरळ 

 

 

Comments

  1. 👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  2. अति सुंदर आणि आवश्यक 👌👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५