माझ्या कविता




 निरुपयोगी जीव


कधी कधी आपण देवाकडे केलेला अट्टहास फारसा बरा नसतो

कधी आपल्यासाठी पण बहुधा त्यांच्या साठी ज्यांवर आपण जीव ओतत असतो !!१!!


वेळ हळू हळू सरत असते वाळूच्या घटिकेत झरझरणारी

अगदी तसंच बहुधा काही गोष्टी सुटत असतात आपल्या हातून !!२!!


योग्य वेळी हात सैल सोडणं गरजेचं असतं अबोल पणे

निदान ते थोडं तरी सुखावह असतं कोणाच्या भल्यासाठी !!३!!


आजकाल जास्त प्रेम, काळजी आणि आपुलकी फारशी बरी नसते

जीव कोणाचा हा का कधी अगदी गुदमरून जातो या अधिम प्रेम भाराने !!४!!


आपण किती निरुपयोगी आहोत या जगी ह्याची प्रचिती येते तेव्हा

जेव्हा मीच मला म्हणतो बसं कर आता नाही सोसवत आता !!५!!


संपू दे पाश आता या देहाचे हे देवा  सरण्या नाती या जन्माची

तुटू दे हे हृदय माझे मोडण्या पाश प्रेमबंधाचे !!६!!


                 ~ प्रदिप नामदेव चोगले

                   दिनांक २१ ऑगस्ट २०२२

                   ०१.१५ मिनिटे, मुबंई


टीप:- मी त्या प्रत्येकाचा ऋणी आहे ज्यांनी मला भरभरून प्रेम, आधार, वात्सल्य, मैत्री आणि सोबत केली. तसेच मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो त्या सगळ्याची ज्यांच्या सोबतीला, नात्याला मी योग्य न्याय नाही देऊ शकलो. ही कविता याचं भावनेतून जन्माला आली असावी बहुधा म्हणून ती अशी व्याकरण आणि काव्य याचं नियम तोडत भरभर कागदावर अवतरीत झाली. शेवटी एवढंच 'चुकले असले काही तर माफी असावी'.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Guardians of the Sea: How the Koli Community’s Wisdom Can Transform Marine Conservation

भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग ४