दर्द, मर्द आणि मी

 मनोगत 



तु  'मोठा मुलगा' आहेस म्हणून ते सगळं करावं लागत.  जे इच्छा नसतात करतो कारण, तु मोठा आहेस असं म्हटलं जात का? कर्तव्य आहे म्हणून .  'पती' म्हणून ते सगळं करावं लागत ज्यात आपल्या मनाला नाही पटत, का? कारण तु 'पुरुष' आहेस. जावई, भाऊ, बाप आणि बरच काही मी 'पुरुष' म्हूणन असतो जगतो आणि वागतो निदान कोणाला नाही पटल तरी तसं करण्याचा प्रयत्न करतो. फार सहजतेने 'पुरुष' म्हणून मला अपयश, निराशा आणि वाईट नशीब या बद्दल चं खापर स्वतःवर घ्यावं लागत. ह्रदयात आलेलं दुःख आणि मनाल झोबणारी लाचारी बऱ्याच वेळा सहन करावी लागते काही व्यक्त न करता. कारण मी अनुभवतो ती कागदी 'स्त्री-पुरुष' समानता ही अस्तित्वात नसतेच. असो मी पुन्हा एकदा या घराचा उंबरठा ओलांडणार आहे मनात अश्रू घेऊन आणि डोक्यावर कर्तव्य भावना ठेऊन कारण मी 'पुरुष' आहे ज्याला दर्द होतं नाही असा किंवा ज्यांनी दर्द होतं आहे असं दाखवायचं नाही असा. 

- प्रदिप नामदेव चोगले (30 जून 2024 )

Comments

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५