भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग ६

अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल : संकटातील एक अद्भुत प्रजाती भाग २ आता या लेखांमध्ये आपण अरबी समुद्री हम्पबॅक व्हेल्सचा भारतीय सागरी क्षेत्रात होत असलेल्या संशोधन कार्याचा मागोवा घेऊ या. पॉमिला सी आणि इतर संशोधक मंडळी यांच्या 2014 मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, अरबी समुद्रात हम्पबॅक व्हेल्सचा एक अत्यंत विशेष गट आढळला आहे - हे व्हेल्स इतर प्रवासी व्हेल्सप्रमाणे स्थलांतर करत नाहीत तर याच समुद्रात सुमारे ७०,००० वर्षे त्या अडकून पडल्या आहेत. (Pomilla et al., 2014) या व्हेल्सच्या जनुकीय अभ्यासावरून असे लक्षात आले आहे की, त्यांचे मूळ दक्षिण हिंदी महासागरातील असावे, पण ते अरबी समुद्रात अडकून त्याचे एक स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण समूह तयार झाले आहे. त्यांच्या जनुकांमध्ये अत्यंत कमी विविधता आढळली आहे, जी त्यांच्या अस्तित्वासाठी धोकादायक ठरू शकते. याशिवाय, त्यांच्या डीएनएमध्ये प्राचीन आणि अलीकडील काळातील लोकसंख्येच्या घटनेची खुणाही सापडली आहे. पॅसिव अकौस्टिक मॉनिटरिंग (PAM) ही एक अंडरवॉटर 'स्पाय नेटवर्क' सारखी आहे, जी जलचर जीवांच्या नैसर्गिक आवा...