
सागर कथा ५ - समुद्री जीव आणि त्यांच्या तऱ्हा ( Oyster drill ) आज आपण एका अश्या गोष्टीला समुजून घेणार जी आपण खूप वेळा समुद्र किनार्यावर पाहतो अथवा खूप वेळा जेव्हा आपण मासे जाळ्यात पकडतो अथवा कालव किवा शिवल्या / शिंपल्या जातो तेव्हा आपण अनुभवतो. शिंपल्या अथवा आणखी काही खुबे ( Oyster / Bivalvia) यांच्या वर आपणास गोलाकार असे काही छिद्र दिसून येतात. आपण जाणून घेऊया आता या मागची गंमत आणि थोडसं समुद्रविज्ञान. विज्ञानाच्या भाषेत सांगयचा तर समुद्रात खूप सारे प्राणी राहतात ज्यांना आपण त्यांच्या विशिष्ट गुणधर्म आणि शरीर रचना यांवरून विवीध गटात ठेऊन अभ्यास केला जातो. आज या लेखामध्ये आपण ज्या प्राणी गटाला विशेष ओळख करून घेणार आहोत त्याला मृदूकाया प्राणी वा Mollusca असं म्हणतात. मृदुकाया प्राणी या गटात मोडणारे प्राणी शरीराने मृदु अर्थात नरम असतात. शरीराचे मुख्य भाग हे कठीण अश्या कवचामध्ये असतात पण क्वचित हे कठीण कवच शरीराअंतर्गत असतात. शिंपले , शिवल्या , खुब्या , माकुल , कालवं , गोगलगाय असे आपल्या परीचयाचे काही समुद्री जीव या गटात मोडतात. या प्राणी वर्गात मोडणार्या...