
परशुरामाची भूमी आणि कासव संवर्धनाची विकास गाथा हि गोष्ट तेव्हा सुरु होते जेव्हा मी सप्टेंबर २०१९ मध्ये माझ्या दोन वर्षाच्या संशोधन भूमिकेतून बाहेर पडलो होतो आणि घरी असलेल्या पारंपारिक मासेमारी व्यवसायाकडे वळायचं ठरवलं. पण म्हणतात ना कि काही गोष्टी या आपल्या साठी जणू परमेश्वरी योजना म्हणून आखून ठेवल्या असतात आणि ते आपल्या सोबत घडायला लागतं आपल्या कल्पनेपलीकडे. काही दिवस मुंबई च्या समुद्री किनारी मासेमारी आणि भटकंती करून झाले होते आणि एक दिवशी एक ईमेल माझ्या मेल बॉक्स मध्ये पडतो. काय आपल्या समुद्री कासव संशोधनात सहभागी व्हायची इच्छा आहे? काय आपण यासाठी काम करू इच्छित आहात? वेळ न दवडता माझ्या मनाने उत्तर दिलं हो, मला यांसाठी जायला हवं. या संशोधनाचं केंद्र होत परशुरामाची भूमी 'कोकण' चा सागरी किनारा. मी याला माझा होकार दर्शक ईमेल पाठवलं आणि काही दिवसात माझी या संशोधन गटात निवड झाली. दि ३१/१०/२०१९ ला रात्री च्या वेळी लाल परीने माझा प्रवास मुंबई सेंट्रल स्थानकातून सुरु झाला. मुंबई-दापोली- हर्णे- पाजपंढरी-आंजर्ल...