अनंत चतुर्दशी - अनुभूती अनंत आनंदाची.... सर्वांना गणरायाच्या आगमनाने खूप आनंद झाला आहे, सर्वत्र उत्साह आणि प्रसन्नतेच वातावरण आहे. मोरया आपल्या घरात गेल्या १० दिवसापासून आला व आपल्या सोबत राहिला. पाहुणचार घेऊन बाप्पा आता निघण्याच्या तयारीला आहे. "जाऊ नको रे गजानना दुःख वाटते माझ्या मना" अशी मनाची सर्वत्र अवस्था झाली आहे. याच निमित्ताने आजचा हा लेख मी ऐका वेगळ्या दृष्टिकोन समोर ठेऊन लिहिण्याचा मी प्रयत्न करत आहे. आजकाल सर्वत्र भारतीय सण आणि उत्सव यांची सांगड पर्यावरण प्रदूषणाबरोबर लावली जाते. एक गट आपल्या समाजात पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नशील असतो तर दुसरा गट या गोष्टीला टाळून उत्सवाची पारंपरिकता जपत फक्त सण साजरे करण्यावर भर देताना दिसून येतो. कोण चूक आणि कोण बरोबर असं भेद करण्यात काहीच अर्थ नाही कारण काही थोड्या बहुत मुदयांवर दोन्ही गट बरोबर असतात आणि काही बाबी बद्दल दोन्ही गटातील मंडळी चुकीची असतात. तर मग काय आहे ही गंमत-गोष्ट मी तुम्हाला आज काही संदर्भ ग्रन्थ आणि शोधपत्रिके च्या वरून स्पष्ट करण्याचा आपण येथे प्रयत्न करू ...