Posts

Showing posts from May 21, 2022

समुद्र संवर्धन लेख मालिका - १

Image
  जागतिक  मत्स्य  स्थलांतर दिन   अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत हे आपण नक्कीच शाळेत शिकलो आहोत. परंतु माणूस सोडून इतर सजीवांना वस्त्र हि बाब अपवाद वगळता अन्न आणि निवारा या गोष्टीसाठी मात्र सतत शोध घ्यावा लागतो. फक्त जमिनीवर राहून आपलं सम्पूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या 'भूचर' सजीवांना पर्यायाने या मूलभूत गरजांची परिपूर्तता करण्यासाठी तसे बरेच पर्याय असतात. परंतु उभयचर अर्थात जमीन आणि पाणी यांमध्ये रहाणारे जीव आणि निव्वळ पाण्यामध्ये राहणारे 'जलचर' यांना मात्र तुलनेने फार कमी पर्याय असतात.    प्रजनन, वाढ, अन्नाची मुबलकता आणि कमीत कमी शिकारी यांसाठी जगभरात गोड्या आणि खाऱ्या पाण्यात आढळणारे मासे हे स्थलांतर करत असतात. दोन ठिकांमधील अंतर, स्थलांतराची दिशा, स्थलांतरित प्रदेशातील पाणवठ्याचा प्रकार आणि जीवनातील कोणत्या वेळी हे मासे स्थलांतर करतात यांवर मत्स्य स्थलांतराचे शास्त्रीय वर्गीकरण करण्यात आले आहे. नदी, तलाव आणि समुद्रकिनारी वेगाने निर्मित होणारी विकास कार्ये भले हि आपल्याला 'स्मार्ट सिटी' वा 'मुबंई - शांघाय' स्वप्ने दाखवत असली म...