महितीपटाच्या माध्यमातून समजुन घेऊ MPA शाळेमध्ये विदयार्थी म्हणून असताना “जीवो जीवस्य जीवनम्” ह्या संकल्पनेचा आपणांस नक्कीच विज्ञानाच्या पुस्तकात परिचय झाला असेल. श्रीमद्भागवत पुराण प्रथम स्कँध, तेरावा अध्याय , श्लोक सेहचालीस मध्ये याचा उगम सापडतो. या श्लोकाचा अर्थ काय? याचा मागोवा जर आपण घेतला तर विविध तज्ञ व्यक्ती त्याचा अर्थ निरनिराळा सांगतील. परन्तु सजीवांचा परस्परांशी असलेला जगण्यास आवश्यक सहसबंध महत्वाचा आहे ही बाब आपण विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून यातून अधोरेखित करू शकतो. जगभरात सध्या वाढत जाणारे तापमान, जागतिक हवामान बदल, आम्लीय पर्जन, वाढती वृक्ष तोड या बाबत विविध प्रसार माध्यमातून आपण नेहेमी वाचत असतो. या गोष्टी आपल्या वर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रित्या परिणाम करत असतात भले आपण समुद्र किनारी राहत असो की ध्रुवीय क्षेत्रात या साऱ्या गोष्टी आपल्यावर नक्कीच परिणाम करत असतात. नुकतीच मी अंटाआर्टिक पेनीसुला आणि प्रिस्टीन सी यांच्या नॅशनल जियोग्राफी सोबत संयुक्त सागरी मोहीम यांवर आधारित एक माहितीपट पहिला. मानवी वस्ती आणि दैनंदिन प्...
Posts
Showing posts from January 21, 2023