अनुभव विश्व _ माझ्या कविता
पवित्र रमजान आणि मी ईश्वराच्या बागेतली प्रत्येक फुलं सुंदर असतात कारण ती त्यांनीच निर्माण केलेली असतात आपण म्हणतो हा छान तो वाईट, ती सुंदर आणि ती फक्त बरी परंतु ही सारी तोकडी मापे असतात आपल्या फुटपट्टीची डोक्यावरून ओढणी घेणारी रुबिना आणि केस मोकळे सोडलेली योजना कानाला जान व अडकवणारा गोपाळ की चर्च मधला जॉन भाई या साऱ्यांची नावे आपण जेव्हा पुकारतो तेव्हा आपल्याला काय आठवते? त्यांची धर्म, जात, प्रार्थनास्थळे आणि पूजेची साधने ईश्वराला कसे अनुभवावे यांचे नानाविधी मार्ग सारे पण जेव्हा सुर जुळून येतात व मन एक होतात तेव्हा तो प्रकट होतो निळे पाणी – मोकळे आकाश कधी गढूळ वा आंधरलेलं नसतं ते कधी उजळ कधी गडद यासाठी दिसते की आपण त्याला केव्हा कसे पाहतो ...