आनंदाचे शोध यात्री _१
निसर्ग संवर्धनाचे वाटेकरी- आर्चि कार "The desire to travel and study the flora and fauna of new regions has flowed through the veins of many naturalists going all the way back to Linnaeous" पृष्ठ क्रमांक ६३ वर लिहलं गेलेलं हे वाक्य वाचून मला अतिशय आनंद झाला. लहान पणापासून आपण निसर्ग पाहत असतो त्याच्या सोबत खेळत बागडत असतो, परंतु निसर्गामध्ये रमणे हि बहुसंख्य मंडळींसाठी एका ठराविक वयानंतर केवळ एक आठवण बनून जाते. पण काही मंडळी या भूतळावर विविध भागात निसर्ग हाच धर्म, ध्येय आणि छंद समजून आपलं जीवन आनंदाने भरून टाकतात. याच नि सर्ग आनंदाचे एक बीज आपल्या हृदयात पेरून जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे 'आर्चि कार' हे होत. दिनांक १६ जून १९०९ या दिनी जन्मलेल्या या व्यक्तीने आपलं संपूर्ण जीवन निसर्ग अभ्यासणे, संशोधन व विशेष म्हणजे समुद्री कासव संवर्धन आणि लोकचळवळ या साठी समर्पित केलं. आज जगभरात निसर्ग संवर्धन विशेतः 'समुद्री कासव संवर्धन व संशोधन' व त्याच बरोबरीने या निसर्ग पूरक जीवनशैली ला साजेशी जीवन ज गणारे स्थानिक मच्छिमार समाज व त्यांना या संवर्धनात सामावून घेण्...