मी, पुस्तके आणि जीवन
एक राजयोगी मी अनुभवलेला - स्वामी विवेकानंद आठवत नाही त्या दिवशी काय तारीख होती परंतु तो दिन माझ्या भाग्याचा होता. २००५ च्या उन्हाळी सुट्टीला मी माझ्या आजोळी होतो. दुपारची जेवणं संपवून सर्व जण ओसरीत पहुडले होते. साधारण साठी पार झालेली माझी आजी कोणती तरी जुनी पुस्तके हळुवार पणे वाचत होती. अश्या वेळी मी देखील त्या जुन्या वाळवी लागलेल्या पुस्तकांच्या रद्दीतून काही खास मिळेल का म्हणून शोधू लागलो. एक पान हाती आले ज्यावर लिहले होते "गीता वाचन करण्या परी फ़ुटबाँल खेळून तुम्ही देवाच्या अधिक जवळ जाऊ शकता, तुम्ही जितक्या वेगाने त्या फ़ुटबाँल ला किक मारू लागत तसे तुमचे शरीर चांगले सुदृढ होईल मग तुम्हाला गीता अधिक चांगली कळेल. तुमच्यातील रक्त थोडे शक्तिशाली झाले मग तुम्ही भगवान श्रीकृष्ण ची महती आणि अर्जुन चं श्रेष्ठत्व समजू शकता" हे बोल होते पु. स्वामी विवेकानंद यांचे. दहावी च्या परीक्षेसाठी रामकृष्ण मिशन ची स्थापन कोणी केली? उत्तर- स्वामी विवेकानंद; या महान व्यक्तिमत्व बाबत माझी इतकीचं काय ती माहिती. परंतु असे विधान हे स्वामी...