भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण - भाग १
सागरी सस्तन प्राणी परिचय कोणाला सागरी सस्तन प्राणी म्हटल पाहिजे? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण ज्या विविध सागरी आधीवासात हे जीव राहतात त्यात कमालीची भिन्नता आहे त्याच बरोबर संशोधक मंडळी ज्या गटात या प्राण्याना एकत्र करतात त्यात देखील त्यांच्या रंग-रूप व आकार यात फार मोठा भेद दिसून येतो. परंतु काही मूलभूत जीवशास्त्रीय बाबी च्या गुणधर्मा अनुरूप आपण हे समजून घेतल तर समजण नक्कीच सोप होईल. ज्याना पाठीचा कणा आहे व असे सागरी प्राणी जे स्वतःच्या शरीराचा तापमान नियंत्रित करू शकतात (गरम रक्ताचे प्राणी), जे फुफुसाच्या साह्याने श्वास घेऊ शकतात त्याच बरोबर जे स्वतःच्या लहान पिल्लांना दूध देतात अश्या असे सारे गुणधर्म असलेल्या प्राणी गटांना सागरी सस्तन प्राणी असे म्हणतात. सस्तन प्राणी या वर्गात (class) असलेले सागरी सस्तन प्राण्यांना मुख्यता चार गटात विभागले गेले आहेत. १) Cetaceans (देवमासे, डॉल्फिन ई.) २) Sirenians (समुद्री गाय) ३) Pinnipeds (सील, सी-लायन ई.) ४) Fissipeds (पानमांजर आणि द्रुविय अस्वल) ...