समुद्र संवर्धन लेख मालिका - ५
मासेमारी आणि सागरी प्राणी : सहसबंध कि संघर्ष way of life ( जीवनशैली) , way of thinking ( विचारशैली) and way of workship ( उपासनाशैली) या त्रयीतुन संस्कृती उभी राहते. यातील प्रत्येक पैलु हा त्या संस्कृती अनुरुप जीवन जगणाऱ्या मानवी समाजाला प्रभावित करत असतो. महाराष्ट्राच्या सागर किनारी राहणाऱ्या व मासेमारी करून आपली उपजीविका करणारा मच्छिमार समाज याला अपवाद नाही. म्हणूनच पालघर मधील वैती, मांगेला, मांची मच्छिमार समाज; ठाणे-मुंबई-रायगड येथील कोळी, आगरी मच्छिमार समाज, रत्नागिरी-सिन्धुदुर्ग येथील कोळी, गाबीत मच्छिमार समाज याच्या संस्कृती मध्ये आपल्याला तुलनात्मक फरक दिसून येतो. या विचार धारेतील फरका अनुरूप ह्या मच्छिमार समाजातील मंडळी मासेमारी करताना त्यांच्या मासेमारी जाळ्यात काय अडकतय आणि समुद्रात कोणते जीव दिसतात या बाबत त्याच्या परस्पर नात्यात कधी संघर्ष दिसून येतो तर कधी सहजता. संपूर्ण महाराष्ट्राचा सागर किनाररी जवळपास २५ मासेमारी क्षेत्र आणि प्रमुख १७३ मासे उतरवणी केंद्रे आहेत ज्या वर जवळपास ४५६ मच्छिमार समाजाची गावे आहेत ज्या...