Posts

Showing posts with the label हवामान बदल

हवामान बदल _ भाग १

  त्रयी हवामान बदल, सागरी आधीवास आणि अंदमान-लक्षद्वीप बेट समूह यांची      ‘हवामान’ आणि ‘हवामान बदल’  या दोन्ही गोष्टी बद्दल आपण बऱ्याच वेळा बोलत असतो पण बहुधा आपण त्यात गल्लत करतो. या लेखाच्या सुरुवातीलाच आपण यातील भेद समजून घेऊया.     हवामान (Weather) म्हणजे एका विशिष्ट वेळी आणि ठिकाणी असलेल्या वातावरणाची स्थिती होय. यामध्ये तापमान, पाऊस, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाश यांसारख्या स्थितींचा समावेश होतो.  हवामान ही वातावरणाची अल्पकालीन स्थिती दर्शवते, जी काही मिनिटांपासून ते दिवसांपर्यंत कधीही वेगाने बदलू शकते(जागतिक हवामान संघटना (WMO). उदाहरणार्थ - आज पुण्यात २५°C तापमानासह जोरदार पाऊस पडत आहे.   हवामान बदल म्हणजे हवामानाच्या स्थितीतील असा बदल, जो त्याच्या गुणधर्मांच्या सरासरीमधील (mean) आणि/किंवा परिवर्तनीयतेमधील (variability) बदलांद्वारे ओळखला जाऊ शकतो (उदा. सांख्यिकीय चाचण्या वापरून) आणि जो दीर्घकाळापर्यंत, सामान्यतः दशके किंवा त्याहून अधिक काळ टिकून राहतो. हवामान बदल हा नैसर्गिक अंतर्गत प्रक्रिया किंवा सौर चक्रातील बदल (modu...